चुंबक या घटकावर सराव चाचणी सोडवा.



 चुंबक 

         लहान असताना सर्व मुलांना चुंबक आवडतो. आपण पण चुंबकासोबत अनेक वेळा खेळलेलो आहोत. चुंबक माहित नाही असे कोणीही नसेल. मात्र वैज्ञानिक दृष्टिकोनातून चुंबकाचा अभ्यास करत असताना त्याची सखोलता आपल्याला माहीत असली पाहिजे. चुंबकाचे अनेक गुणधर्म आहेत. चुंबकाचे  विविध उपयोग आहेत. आपल्याला माहित सुद्धा नाही अशा अनेक ठिकाणी चुंबक असतो. या चुंबकाचे गुणधर्म समजून घेऊन त्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी आपण चाचणी तयार केली आहे. चाचणीतील सर्व प्रश्न काळजीपूर्वक सोडवा. प्रश्नातून चुंबकासंबंधीच्या वेगवेगळ्या संकल्पना स्पष्ट होतील. या संकल्पना विद्यार्थ्यांनी वहीत लिहून घेतल्या तर त्यांना याचा नक्कीच उपयोग होईल.