विज्ञान विषयातील महत्वाच्या घटकावर आधारित सराव चाचणी क्र. 8





         खाली महत्त्वाच्या वीस प्रश्नाची एक चाचणी देण्यात आलेली आहे. विविध घटकातील महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव होण्याच्या दृष्टिकोनातून प्रश्न काढण्यात आलेले आहेत. विद्यार्थ्यांनी सर्व प्रश्न व त्यांची उत्तरे वहीत लिहून त्यांचा योग्य पद्धतीने अभ्यास करावा. चाचणीच्या खाली काही महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत. ते सर्व मुद्दे प्रश्नांना अनुसरून आहेत. त्या प्रश्नांबद्दल अधिक माहिती मिळण्यासाठी उपयुक्त होतील. ते सर्व मुद्दे सखोल वाचन करावे.
 चाचणी सोडवण्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा





        
   या पूर्वीच्या सराव चाचण्या सोडवण्यासाठी खाली क्लिक करा.
        CLICK HERE


           आपल्या वातावरणामध्ये जी हवा असते त्या हवेमध्ये वेगवेगळ्या वायूंचे रेणू सतत हालचाल करत असतात. हे सर्व रेणू जेव्हा एखाद्या वस्तूवर आढळतात तेव्हा त्या वस्तूवर काही प्रमाणात दाब निर्माण करतात. हवेच्या या दाबालाच आपण वातावरणाचा दाब असे म्हणत असतो. हा वातावरणाचा दाब सर्व दिशांनी समान पसरलेला असतो. वातावरणाचा दाब वायू दाब मापकाने मोजता येतो. हा वातावरणाचा दाब समुद्रसपाटीपासून जसे जसे उंच जाऊ तसे तसे कमी-कमी होत जातो. डॅनियल बर्नोली या शास्त्रज्ञाने एक महत्त्वाचे तत्त्व मानले. या शास्त्रज्ञांनी असे तत्त्व मांडले हे हवेचा वेग वाढला तर तिचा दाब कमी होतो या उलट जर हवेचा वेग कमी झाला तर दाब वाढत असतो.
          मृदेचे वेगवेगळे प्रकार केले जातात. यामध्ये रेताळ मृदा, पोयटा मृदा, चिकन मृदा, असे मृदेचे त्यातील कणांच्या प्रमाणावरून प्रकार केले जातात.पोयटा मृदा यामध्ये कणांचा आकार मध्यम स्वरूपाचा असतो. पोयटा मृदेलाच गाळाची मृदा असे म्हणतात. ही मृदा पिकांसाठी अन्नद्रव्य मोठ्या प्रमाणावर पुरवू शकते.

             नायट्रोजनचे जैविक स्थिरीकरण हे दोन प्रकारचे सूक्ष्मजीव घडून आणत असतात. यामध्ये रायझोबियम हे सूक्ष्मजीव शिंबावर्गीय वनस्पतींच्या मुळांवरील ज्या गाठी असतात त्या गाठींमध्ये हे जिवाणू वाढवतात. हे सूक्ष्मजीव हवेमधील नायट्रोजन शोषून घेतात. त्या नायट्रोजनच्या संयुगात रूपांतर करतात. मातीमधील हे सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजनचे त्यांच्या संयुगाच्या रूपात रूपांतर करत असतात.
        वनस्पतींची वाढ होत असताना त्यांना वेगवेगळ्या पोषक द्रव्यांची गरज असते. त्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, मॅग्नीज, झिंक यासारख्या पोषक द्रव्यांची गरज वनस्पतींना भासत असते. ही पोषक द्रव्य जर योग्य प्रमाणात वनस्पतींना मिळाली तर त्यांची वाढ चांगल्या प्रमाणात होते. मात्र यांचा अभाव जाणू लागला तर त्याचे दुष्परिणाम वनस्पतीवर घडून येत असतात.
         नायट्रोजन या पोषक द्रव्यामुळे वनस्पतींना प्रथिने हरिद्रव्य पेशीद्रव्य यांच्यामध्ये हा महत्त्वाचा घटक ठरत असतो. जर वनस्पतींना नायट्रोजनची कमतरता भासू लागली तर त्यांची वाढ खुंटते. तसेच पाने पिवळी पडायला लागतात. फॉस्फरसमुळे प्रकाश ऊर्जेचे वनस्पती रासायनिक ऊर्जेत रूपांतर करू शकतात. जर वनस्पतींना फॉस्फरसचा अभाव जाणवू  लागला तर वनस्पतींचे अकाली पाने गळणे सुरू होते. वनस्पतींना उशिरा फुले येतात .त्यांच्या मुळांची वाढ खुंटते. त्याच्यामुळे त्याचा परिणाम वनस्पतीवर निश्चित पडत असतो.
        अन्न हा मानवी जीवनामध्ये खूप महत्त्वाचा घटक आहे. अन्न या विषयी सर्व सामान्य व्यक्तींमध्ये जाणीव जागृती निर्माण व्हावी, अन्न टिकवण्यापासून ते आपल्या ताटात येईपर्यंत त्याचा जो दीर्घ प्रवास आहे तो प्रत्येकाला समजण्यासाठी त्याच्याविषयी जनजागृती निर्माण होण्यासाठी 16 ऑक्टोबर हा जागतिक अन्नसुरक्षा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याचा महत्त्वाचा उद्देश आहे अन्नाची सुरक्षा करणे आणि मोठ्या प्रमाणात होणारी अन्नाची नासाडी टाळणे.
        पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जेव्हा ढगांचा गडगड होतो तेव्हा विजांचा कडकडाट देखील होतो. या विजांमुळे निर्माण होणारी उष्णता व त्यातून बाहेर पडणारा प्रकाश यामुळे हवेतील नायट्रोजन व ऑक्सिजन यांच्यामध्ये एक रासायनिक अभिक्रिया होऊन नायट्रोजन ऑक्साईड हा वायू तयार होतो. अनेक वेळा हा वायू पावसाच्या पाण्यात मिसळून जमिनीवर येत असतो. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. असे पाणी पिकांना नत्र पुरवत असते. विजेच्या उर्जेमुळे हवेतील ऑक्सिजनचे ओझोन मध्ये रूपांतर होत असते. ओझोन हा वायू मनुष्यासाठी खूप लाभदायक ठरत असतो. त्याचे कारण म्हणजे सूर्यापासून जे हानिकारक अतिनील किरणे पृथ्वीवर येत असतात त्या किरणांपासून सजीवांचे रक्षण करण्याचे काम हा ओझोन वायू करत असतो.