ADITYA L1 मोहीम सविस्तर माहिती



 ADITYA L1 मोहीम सविस्तर माहिती 


  • सूर्याचा अभ्यास करणारे यान ADITYA L1 हे 2 सप्टेंबर 2023 रोजी 11 वाजून 50 मिनिटांनी रवाना झाले. 
  • हे यान भारताच्या ISRO या अवकाश संशोधन संस्थेने श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपित केले आहे.
  • PSLV -C57 या अग्निबाणाद्वारे ADITYA L1  चे अंतराळात प्रक्षेपण करण्यात आले आहे.

  • यान प्रक्षेपित केल्यानंतर 63 मिनिटांनी अग्निबाणाने ADITYA L1  ला पृथ्वीच्या कक्षेत नेऊन सोडले.
    •  हे यान पुढील 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत राहणार आहे. 
    • ADITYA L1 ला त्याचा L1 पॉईंट गाठण्यासाठी 110 दिवसांचा प्रवास करावा लागणार आहे.
    •  सूर्यावरील वातावरणाची दूर अंतरावरून निरीक्षणे नोंदवण्यासाठी या अवकाश यानाचा उपयोग होणार आहे.
    •  हे यान सौरवायूच्या स्थितीची ही नोंद करणार आहे.
    • पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर अंतरावरील लैंग्वेज पॉईंट म्हणजेच L1 येथून हे यान अभ्यास करणार आहे.
    • हे ठिकाण निवडण्याचे कारण म्हणजे सूर्याच्या ग्रहणाचा परिणाम येथे जाणवत नसल्यामुळे त्या भागातून सूर्यावर सतत लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. सूर्याच्या अभ्यासाची भारताने हाती घेतलेली ही पहिली मोहीम आहे.
    •  या मोहिमेसाठी स्वदेशी बनावटीचे तंत्र वापरण्यात आले आहे.      
    • सूर्यापासून किरणोत्सर्ग कसा होतो, त्यातील विकीरणांना रोखण्याचे काम पृथ्वीचे वातावरण व तिचे चुंबकीय क्षेत्र कशाप्रकारे करते? किरणोत्सर्गाचा तसेच सूर्याचा कोरोना तसेच सर्व वायू यांचा सुद्धा अभ्यास हे यान करणार आहे.   
    • आदित्य L1 दररोज सूर्याची 1400 छायाचित्रे काढून ती इस्रोकडे पाठवणार आहे. 
    पृथ्वी आणि सूर्याचे अंतर जवळपास 15 कोटी किलोमीटर आहे.
    तर चंद्र पृथ्वीपासून 3 लाख 84 हजार किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. 
    लैंग्वेज पॉईंट म्हणजे काय? 
          अवकाशातील दोन वस्तूमधील गुरुत्वाकर्षण शक्ती जिथे प्रभाव शून्य होते त्या ठिकाणाला लँग्वेज पॉईंट म्हणतात. ADITYA L1 या ठिकाणी जाणार आहे त्या लँग्वेज पॉईंट ला म्हणजे एल वन या ठिकाणी पृथ्वी आणि सूर्यामधील गुरुत्वाकर्षण शक्तीचा कोणत्याही स्वरूपात परिणाम होत नाही. संपूर्ण अंतराळामध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती प्रभाव शून्य होणारे L1, L2, L3, L4, आणि L5,  असे एकूण पाच लँग्वेज पॉईंट आहेत. त्यापैकी  L1,  L२ आणि  L3 हे तीन पॉईंट सूर्य आणि पृथ्वी दरम्यानच्या सरळ रेषेत आहेत. तर L4 आणि  L5 हे पृथ्वीच्या दोन्ही बाजूंना समपातळीमध्ये आहेत.

    आदित्य L1 यावर 7 वेगवेगळ्या प्रकारचे उपकरण आहेत.
    • 1)  व्हिजीबल इमिशन लाईन कोरोना ग्राफ - VELC
     हे उपकरण सौर वादळे आणि त्यातून निर्माण होऊन बाहेर पडणाऱ्या उष्णतेचा अभ्यास करणार आहे. हे उपकरण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अस्ट्रोफिजिक्स, बंगळुरू यांनी तयार केलेले आहे.
    • 2) सोलर अल्ट्रा व्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप - SUIT
     हे उपक्रम सूर्याचा पृष्ठभाग आणि त्यावरील वातावरणाचे छायाचित्रीकरण करणार आहे. सूर्यातून बाहेर पडणाऱ्या ऊर्जेचे वितरण कसे होते? त्याचे मोजमाप हे उपकरण करणार आहे. या  या उपकरणाची निर्मिती इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रॉनॉमी अँड ऍस्ट्रोफिजिक्स म्हणजेच आयुका पुणे यांनी तयार केले आहे.
    •  3) आदित्य सोलार विंड
    •  4) पार्टिकल एक्सपेरिमेंट आणि प्लाजमा एनालायझर पॅकेज फॉर आदित्य PAPA
    सौर वादळे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या ऊर्जा यांच्या वितरणाचा अभ्यास हे उपकरण करणार आहे. फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी अहमदाबाद व स्पेस फिजिक्स लॅबोरेटरी तिरुअनंतपुरम यांनी हे उपकरण तयार केली आहेत.
    • 5) सोलर लो इनर्जी एक्स रे
    • 6)स्पेक्ट्रोमीटर आणि हाय इनर्जी L 1 ओबितींग एक्सरे स्पेक्ट्रोमीटर 
    हे उपक्रम सूर्यावरून बाहेर पडणाऱ्या क्ष-किरणांचा अभ्यास करणार आहे. या उपकरणाची निर्मिती यु.आर. राव सॅटॅलाइट सेंटर बंगळुरू यांनी केलेली आहे. 
    • 7] मग्नाटोमीटर 
    आंतरग्रहीय चुंबकीय क्षेत्रांचा अभ्यास हे उपकरण करणार आहे. लॅबोरेटरी फॉर इलेक्ट्रो ऑप्टिक्स सिस्टीम बंगळूर यांनी हे उपकरण तयार केलेले आहे.

           
     सूर्या बाबत थोडी महत्त्वाची माहिती -
    • सूर्याचा व्यास पृथ्वीपेक्षा 109 पट मोठा आहे.
    •  सूर्याची वयोमर्यादा सुमारे 460 कोटी वर्ष इतकी आहे.
    •  पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधील अंतर 15 कोटी किलोमीटर इतकी आहे.
    •  13 लाख पृथ्वी आणि अन्य ग्रह सहाशे वेळा सूर्यात सामावू शकतात.
    •  ऑक्सिजन, कार्बन, नायट्रोजन, सिलिकॉन, मॅग्नेशियम, निऑन, लोह, आणि गंध यांचा सुद्धा समावेश आहे.
    • सूर्यावर प्रत्येक एका सेकंदाला एक लाख  स्पोट होतात.
    • सूर्याच्या गाभाऱ्यात तयार झालेली ऊर्जा पृष्ठभागातून बाहेर पडेपर्यंत दहा लाख वर्षाचा कालावधी लागत असतो.    
    या यानाला आदित्य हे नाव का ठेवण्यात आले ? 
          तर याचे काही पौराणिक संदर्भ असल्याचे आपल्या सगळ्यांनाच माहीत असेल किंवा नसेल. पुराणांमध्ये एक कथा अशी आहे कश्यप नावाचे एक ऋषी होते. त्या ऋषींची पहिली पत्नी अदिती होती. कश्यप ऋषी आणि अदिती यांना एक पुत्र झाला. त्याचे नाव होते आदित्य. भारतीय पुराणात त्याच्या अकरा भावांचा देखील उल्लेख आहे. आदित्य आणि त्याचे 11 भाऊ म्हणजेच या बारा बंधूंच्या समूह होता. या समूहाला आदित्य असेच म्हणत असत. सूर्याला समानार्थी शब्द आदित्य हाच आहे. याचा अर्थ सौर वर्षाचे बारा महिने असे म्हटले जाते. सूर्य देवाच्या रथाला सात घोडे जुंपल्याचे आख्यायिका अनेकांनी वाचली असेल किंवा ऐकली असेल. हे सात घोडे म्हणजे आठवड्याचे सात दिवस. या सर्वांमध्ये योगायोग असावा की आदित्य एल वन या मोहिमेमध्ये सूर्य निरीक्षणासाठी जाणाऱ्या यानावर देखील सातच उपकरणे आहेत.