आपली पृथ्वी, आपली सूर्यमाला

   तारे

  •  ज्या  चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात.
  • तारे हे स्वयंप्रकाशित असतात.
  • सूर्य हा एक तारा आहे.

ग्रह -

  • ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना ग्रह म्हणतात.
  • ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो. 
  • ग्रह स्वतःभोवती फिरता फिरता ताऱ्याभोवती फिरतात.

  • उपग्रह -
  • काही खगोलीय वस्तू ग्रहा भोवती परिभ्रमण करतात त्यांना उपग्रह म्हणतात.
  • उदा. चंद्र

लघुग्रह -

  • मंगळ व गुरू या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान खगोलीय वस्तूंचा एक पट्टा आहे या वस्तूंना लघुग्रह म्हणतात.
  • जागतिक लघुग्रह दिवस ३० जून आहे.     

  • भारतीय अवकाश संशोधन संस्था [ इस्रो - ISRO]

  • इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1969 रोजी बेंगलोर येथे झाली.
  • इस्रो या संस्थेचे ब्रीद वाक्य 'मानवी सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान' हे आहे.
  • सध्या इसरो चे 10 वे अध्यक्ष एस. सोमनाथ हे आहेत. तर यापूर्वीचे अध्यक्ष 9 वें के.सीवन हे होते
  • भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट 19 एप्रिल 1975 ला अवकाशात सोडला.
  •  ISRO द्वारे 22 ऑक्टोबर 2008 रोजी चंद्रावर एक यान सोडले हे चंद्रयान-1 या नावाने ही मोहीम ओळखली जाते.

मंगलयान - MOM - MARS ORBIT MISSION

  • 5 नोव्हेंबर 2013 रोजी मंगलयान मंगळ ग्रहाच्या दिशेने झेपावले.
  • मंगळयान ही भारताची पहिली मंगळ मोहीम असून हे यान आंध्रप्रदेश राज्यातील श्रीहरिकोटा येथून सतीश धवन अंतराळ केंद्रावरून मंगळाच्या दिशेने ५ नोव्हेंबर, इ.स. २०१३ रोजी प्रक्षेपित केले गेले. यासाठी पीएसएलव्ही सी-२५ हे प्रक्षेपण अस्त्र वापरण्यात आले.
  • 1984 साली अवकाशात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा.

  • त्यांनी अवकाशातून भारताकडे पाहताना भारतीयांना ' सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा ' हा संदेश पाठवला.

  • नील आर्मस्ट्रॉंग हे चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले व्यक्ती होते त्यांनी 1969 मध्ये चंद्रावर पहिले पाऊल ठेवले ते अमेरिका या देशाचे होते.
  • तर आल्ड्रीन हे चंद्रावर पाऊल ठेवणारे त्यांचे सहकारी दुसरे व्यक्ती होते.

प्लुटो

  •  प्लूटोचा शोध १९३० साली लागला.
  •  तेव्हापासून २००६ पर्यंत प्लूटोला सूर्यमालेतील नववा ग्रह समजण्यात येत असे. 
  • पण २०व्या शतकाच्या शेवटी तसेच २१व्या शतकाच्या सुरुवातीला प्लूटोसारख्या अनेक खगोलीय वस्तूंचा शोध लागला. 
  • यातील नोंद घेण्याप्रत वस्तू म्हणजे विखुरलेल्या चकतीमधील एरिस, ज्याचे वस्तुमान प्लूटोपेक्षा २७% जास्त आहे. २४ ऑगस्ट २००६ मध्ये आंतरराष्ट्रीय खगोलीय संघटना (आय.ए.यू.)ने सर्वप्रथम ग्रहाची व्याख्या केली.
  •  या व्याख्येनुसार प्लूटोला ग्रहांच्या यादीतून वगळण्यात आले व त्याचे वर्गीकरण बटु ग्रह या नवीन वर्गात करण्यात आले.
  • सध्या एकूण ८ ग्रह आहेत 

आपली पृथ्वी 

  • पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या अक्षास (आस), काटकोन करून असलेले आणि उत्तर व दक्षिण ध्रुवापासून समान अंतरावर असणारे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील काल्पनिक महावर्तुळ म्हणजे विषुववृत्त होय. 
  • विषुववृत्त म्हणजे शून्य अंश अक्षवृत्त.
  •  विषुववृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे विभाजन होते.
  •  विषुववृत्तावरील ठिकाणांवर सर्वात जलद सूर्योदय आणि सूर्यास्त होतो.
  •   विषुववृत्तावर नेहमी १२ तास दिवस तर १२ तास रात्र अनुभवायास मिळते.
  •  इतर ठिकाणी दिवस आणि रात्र ऋतूप्रमाणे लहान अथवा मोठ्या होतात.

परिभ्रमण 

  • पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते याला परिभ्रमण म्हणतात
  • पृथ्वीच्या सूर्याभोवती एका परिभ्रमणाला जो कालावधी लागतो त्याला वर्ष म्हणतात.
  • एका वर्षात सुमारे 365 दिवस आणि 6 तास असतात.

परिवलन 

  • पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती गोल फिरते त्या क्रियेला पृथ्वीचे परिवलन असे म्हणतात.
  • पृथ्वी स्वतःभोवतीची एक फेरी २३ तास, ५६ मिनिटे आणि ४ सेकंदात पूर्ण करते.

21 जून - हा वर्षातील सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान रात्र असते.

22  डिसेंबर -हा वर्षातील सर्वात लहान दिवस व सर्वात मोठी रात्र असते.

21 मार्च व 23 सप्टेंबर रोजी 12 तास दिवस व 12 तास रात्र असते, म्हणजेच दिवस व रात्र समान असते.

  • सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह बुध हा आहे.
  • सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह नेपच्यून हा आहे.
  • सर्वात मोठा ग्रह गुरु हा आहे.
  • एकूण आठ ग्रह आहेत.
  • पृथ्वी हा सूर्यापासून तिसऱ्या स्थानावर येणारा ग्रह आहे.
  • पृथ्वी हा ग्रह शुक्र आणि मंगळ या दोन ग्रहांच्या मध्ये येतो.