प्रश्नपेढी क्र. 1 - इयत्ता 7 वी - विज्ञान

 


       

प्रश्नपेढी

इयत्ता 7 वी - विज्ञान 

       इयत्ता सातवी विज्ञान विषयातील सुरुवातीच्या काही घटकावर महत्त्वाच्या प्रश्नांची प्रश्नपेढी  तयार करण्यात आलेला आहे. ही प्रश्नपेढी वाचून विद्यार्थ्यांनी वहीत सोडवण्याचा प्रयत्न करावा. या प्रश्नपेढीमध्ये पाठातील सर्व प्रकारच्या संकल्पना स्पष्ट होतील या दृष्टीने ही प्रश्नपेढी तयार करण्यात आली आहे. ही प्रश्नपेढी तयार करत असताना विद्यार्थ्यांनी या इयत्तेमध्ये मध्ये साध्य करावयाच्या अध्ययन निष्पत्तींचा सुद्धा विचार करण्यात आलेला आहे. अध्ययन निष्पत्तींना अनुसरून त्या त्या उपघटकावर प्रश्न तयार करण्यात आलेले आहेत. 

      या प्रश्नांचा विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा देताना नक्कीच उपयोग होईल यात शंका नाही. विद्यार्थ्यांनी हे प्रश्न व यांची उत्तरे वहीवर लिहून काढले तर त्यांना निश्चितच याचा फायदा होणार आहे.

   ही प्रश्नपेढी खालील घटकावर आधारित आहे.

1. नैसर्गिक संसाधने 

2.सजीवातील पोषण 

3.भौतिक राशींचे मापन 

4.गती बल व कार्य

5. स्थितीक विद्युत

6. उष्णता 

7.पेशीरचना आणि सूक्ष्मजीव


 नैसर्गिक संसाधने

  • वातावरणाचा दाब म्हणजे काय?
  • समुद्रसपाटीला वातावरणाचा दाब प्रति चौरस मीटर ला किती असतो?
  • हवेचा वेग वाढला तर तिचा दाब कमी होतो हे तत्व कोणत्या शास्त्रज्ञाने मांडले?
  • डॅनियल बर्नोली या स्वीडिश शास्त्रज्ञाने १७२६ साली वातावरणाचा दाब याविषयी मांडलेले महत्त्वाचे तत्व कोणते?
  • प्रकाशाचे विकिरण म्हणजे काय?
  • पृथ्वीवर हवाच नसती तर त्याचा पृथ्वीच्या पृष्ठभागावरील तापमानात काय बदल झाला असता?
  • जास्त थंडीमध्ये हवेच्या घनतेत काय फरक पडतो?
  • ध्वनीचे प्रसारण होण्यासाठी माध्यम म्हणून कशाचा उपयोग होतो?
  • आकारमान म्हणजे काय?
  • वस्तुमान कशास म्हणतात?
  • वस्तुमान आणि आकारमान यांची एकके कोणती?
  • किती अंश सेल्सिअस ला पाण्याची घनता सर्वात जास्त असते?
  • पाण्याचे असंगत आचरण म्हणजे काय?
  • कोणत्या मृदेला गाळाची मृदा असेही म्हणतात?
  • कोणत्या मृदेची पिकाला अन्नद्रव्य पुरवण्याची क्षमता सर्वात जास्त असते?
  • कोणत्या मृदेमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता सर्वाधिक असते?
  • सौंदर्यप्रसाधनात कोणत्या मृदेचा वापर होतो?
  • कणत्या मृदेपासून कुंड्या सजावटीच्या वस्तू बनवल्या जातात?
  • चिनी मृदेला दुसरे नाव काय?
  • उदासीन मृदेचा सामू किती असतो?
  • pH 6.5 पेक्षा कमी सामू असलेल्या मृदेला कोणती मृदा म्हणतात?
  • नदीची सुपीकता कमी होण्याची कारणे कोणती?
  • जागतिक मृदा दिन कधी असतो?

नैसर्गिक संसाधने - हवा, पाणी आणि जमीन सविस्तर माहिती अभ्यासा

 सजीवातील पोषण

  • प्रकाश संश्लेषणामध्ये वनस्पती कोणत्या वायूचा उपयोग करतात?
  • ग्लुकोज चे रेणुसूत्र काय आहे?
  • वनस्पती प्रकाश ऊर्जेचे रूपांतर कोणत्या ऊर्जेमध्ये करतात?
  • शिंबावर्गीय वनस्पतींच्या मुळावर कोणते जिवाणू असतात?
  • मातीमधील कोणते सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजनचे त्यांच्या संयुगात रूपांतर करतात?
  • नायट्रिक ऑक्साईड तयार होताना कोणत्या दोन वायूंचा संयोग होतो?
  • खालीलपैकी कोणते सहजीवी वनस्पतीचे उदाहरण आहे?
  • परजीवी वनस्पतीची कोणतीही दोन उदाहरणे लिहा?
  • कोणती वनस्पती कीटकांचे भक्षण करून त्यापासून अन्नघटक मिळवतात?
  • ड्रॉसेरा बर्मानी या कीटक भक्षक वनस्पतीचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?
  • वनस्पतींची वाढ खुंटणे पाने पिवळी होणे हे कोणत्या पोषक द्रव्याच्या अभावामुळे होते?
  • प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रुपांतर करण्यासाठी वनस्पतींना कोणत्या पोषक द्रव्याची गरज असते?
  • चयापचयाच्या कार्यासाठी आवश्यक असणारे पोषक द्रव्य कोणते?
  • उत्सर्जन म्हणजे काय?
  • एक पेशीय सजीवांची कोणतीही दोन उदाहरणे सांगा?                         

 अन्नसुरक्षा, संतुलित आहार आणि जीवनसत्व या विषयावर सराव चाचणी सोडवण्यासाठी खाली क्लिक करा.

 भौतिक राशींचे मापन

  • आदेश राशींची नावे सांगा?
  • सदिश राशींची नावे सांगा?
  • वस्तूच्या जडत्वाचे गुणात्मक माप काय आहे?
  • वस्तुमानावर जेवढे गुरुत्वीय बल कार्य करते त्याला काय म्हणतात?
  • वजन कोणत्या प्रकारची राशी आहे?
  • MKS या पद्धतीमध्ये कोणत्या राशी आधारभूत मानण्यात येतात?
  • कोणत्या राशीला अंतर आणि काळ या राशींचे गुणोत्तर म्हणतात?
  • पायाभूत राशी कोणत्या?
  • प्राचीन काळात इजिप्त मध्ये माणसाच्या कोपरापासून मधल्या बोटाच्या टोकापर्यंतच्या अंतरास काय म्हणत?
  • ग्राहकांचे वजन मापन मध्ये फसवणूक होऊ नये यासाठी शासनाच्या कोणत्या विभागात वजनमाप उपविभाग कार्यरत असतो?
  • TMC याचा फुल फॉर्म काय आहे?
  • एक घनफूट पाणी म्हणजे किती लिटर पाणी?

गती, बल व कार्य

  • अंतर म्हणजे काय?
  • गतिमान वस्तूने आळंदीच्या ठिकाणापासून अंतिम ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी एका दिशेने पार केलेले कमीत कमी अंतर म्हणजे काय?
  • वेगाचे सूत्र काय आहे?
  • अंतर ही कोणती राशी आहे?
  • बोल आणि त्यामुळे घडणाऱ्या तोरणा संबंधीचा अभ्यास प्रथम कोणत्या शास्त्रज्ञाने केला?
  • ऊर्जा म्हणजे काय?
  • एस आय पद्धतीत कार्याचे एकक काय आहे?
  • सीजीएस पद्धतीत कार्याचे एकक काय आहे?

गती, बल, ऊर्जा आणि कार्ये सविस्तर अभ्यासा

 स्थितिक विद्युत

  • एकाच प्रकारचे प्रभार असलेल्या दोन कांड्या एकमेकींना दूर ढकलतात याला काय म्हणतात?
  • विद्युत प्रभाराला धनप्रभार आणि ऋण प्रभार अशी नावे कोणत्या शास्त्रज्ञाने दिली?
  • प्रत्येकाने विद्युत दृष्ट्या उदासीन असतो हे वाक्य बरोबर की चूक?
  • अंबरला ग्रीक भाषेत काय म्हणतात?
  • अंबरच्या आकर्षण गुणधर्माला थॉमस ब्राऊन ने काय नाव दिले?
  • वस्तूवरील विद्युत प्रभार ओळखण्याचे साधे उपक्रम कोणते?
  • विजेच्या ऊर्जेमुळे हवेतील कोणत्या वायूचे ओझोन मध्ये रूपांतर होते?
  • सूर्यापासून येणाऱ्या हानीकारक अतिनील किरणांपासून आपले रक्षण कोणता वायू करतो?
  • ढगातून पडणाऱ्या विजेच्या आघातापासून बचाव करण्यासाठी जे उपकरण वापरतात त्याला काय म्हणतात?

 उष्णता

  • पदार्थाचे तापमान मोजण्यासाठी कशाचा वापर होतो?
  • उष्णतेचे एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे जाणे याला काय म्हणतात?
  • उष्णतेचे वहन कोणत्या पदार्थांमध्ये होत असते?
  • माध्यम नसतानाही होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणास काय म्हणतात?
  • रात्रीच्या वेळी आजूबाजूच्या परिसर दिसू शकेल असा कॅमेरा विकसित केला आहे त्याला कोणता कॅमेरा म्हणतात?
  • एखाद्या पदार्थाची उष्णतेची प्रारणे शोषून घेण्याची क्षमता कशावर अवलंबून असते?
  • द्रवाला उष्णता दिली की द्रवाच्या कणांमधील अंतर वाढते त्याचे आकारमान वाढते याला काय म्हणतात?
  • पहिला थर्मास फ्लास्क कोणत्या शास्त्रज्ञांनी तयार केला? 
  • उष्णता या घटका विषयी सविस्तर माहिती वाचा

  •  पेशीरचना आणि सूक्ष्मजीव
  • सर्व सजीवांचा रचनात्मक आणि कार्यात्मक मूलभूत घटक कोणता?
  • पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने दिले आहे?
  • सर्व सजीव पेशंट पासून बनलेले असतात आणि पेशी हा सजीवांचा पायाभूत घटक आहे हा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडला?
  • सर्व पेशींचा जन्म हा पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशी मधूनच होतो असे कोणत्या शास्त्रज्ञाने स्पष्ट केले?
  • 1673 मध्ये विविध भिंगे एकत्र करून सूक्ष्मदर्शक हे उपकरण कोणत्या शास्त्रज्ञाने तयार केले?
  • एक मिलीमीटर म्हणजे किती मायक्रोमीटर?
  • एक मायक्रोमीटर म्हणजे किती नॅनोमीटर?
  • सजीवांच्या पेशींचा आकार कशांशी  निगडित असतो?
  • पेशीचे सर्वात बाहेरचे आवरण कोणते?
  • पेशी मध्ये पेशी केंद्र काव्यतिरिक्त द्रवरूप भाग असतो त्याला काय म्हणतात?
  • पेशीचे सर्वात महत्त्वाचे अंगक कोणते?
  • किती मायक्रोमीटर पेक्षा लहान वस्तू आपल्या डोळ्यांना दिसू शकत नाही?
  • पोलिओच्या विषाणूचा आकार किती नॅनोमीटर असतो?
  • सूक्ष्मजीवांचा आकार किती मायक्रोमिटर पेक्षा लहान असतो?
  • राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था कुठे आहे?
  • सूक्ष्म जीवांच्या क्रियेमुळे काही कार्बनी पदार्थाचे दुसऱ्या कार्बनी पदार्थात रूपांतर होण्याच्या रासायनिक क्रियेला काय म्हणतात?
  • ऍसिटिक आम्ल सायट्रिक आम्ल लॅक्टिक आम्ल जीवनसत्वे व प्रतिजैविके यांच्या निर्मितीमध्ये कोणत्या प्रक्रियेचा उपयोग केला जातो?
  • प्रतिजैविके कशापासून बनवली जातात?
  • डासांच्या नात्यांच्या होणाऱ्या तीन आजारांची नावे सांगा?
  • निरोगी मानवी शरीराचे तापमान सुमारे किती असते?