सूक्ष्मजीव या विषयी सविस्तर माहिती

 

सूक्ष्मजीव या विषयी सविस्तर माहिती

 Detailed information about microorganisms 

सूक्ष्मजीव microorganisms

  • खालील सर्व प्रश्न काळजीपूर्वक वाचून त्यांच्या उत्तरासाठी खाली दिलेले मुद्दे सविस्तर अभ्यासा.
  • सर्व संकल्पना व्यवस्थित स्पष्ट होण्यासाठी खाली प्रश्न समजून घेऊन त्यांचे उत्तरे वहीत लिहून काढा. विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनासाठी हे खूप महत्त्वाची बाब ठरेल.
  • स्वतःचे पोषण करताना काही सूक्ष्मजीव कोणते विषारी पदार्थ अन्नात मिसळतात?
  • जगातील पहिले प्रतिजैविक कोणते?
  • प्रतिजैविके म्हणजे काय?
  • पेनिसिलीन चा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?
  • किण्वन म्हणजे काय?
  • हवेतील नायट्रोजन पासून नायट्रोजनची संयुगे कोण बनवतात?
  • दुधाचे दह्यात रूपांतर होताना कोणत्या आम्लाची निर्मिती होते?
  • पॅरामेशियम या सूक्ष्मजीवांचा आकार किती असतो?
  • टायफाईड चे रोगजंतू किती मायक्रोमीटर चे असतात?
  • पोलिओच्या विषाणूंचा आकार किती असतो?
  • सूक्ष्मजीव म्हणजे काय?
  • सूक्ष्मजीवांच्या अभ्यासाच्या शास्त्राला काय म्हणतात?
सूक्ष्मजीव microorganisms
  • जे जीव मानव स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकत नाहीत त्यांना सूक्ष्मजीव म्हणतात .
  • या सूक्ष्मजीवांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास सूक्ष्मजीवशास्त्र Microbiology असे म्हणतात.
  • सूक्ष्मजीवांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शीचा वापर करावा लागतो. 
  • 100 मायक्रोमीटर पेक्षा लहान वस्तू आपल्या डोळ्यांना दिसू शकत नाहीत.
  • सूक्ष्मजीवांचे संयुक्त सूक्ष्मदर्शी खाली निरीक्षण केले जाते.
  •  काही सूक्ष्मजीवांच्या निरीक्षणासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीचा वापर करावा लागतो.
  • राष्ट्रीय पेशी विज्ञाय संस्था, पुणे.
  सूक्ष्म जीवांचे आकार - Size of Microorganisms
1) पॅरामेशिअम सुमारे 100 मायक्रोमीटर 
2) टायफाईड चा रोगजंतू 1 ते 3 मायक्रोमीटर
3 पोलिओचा विषाणू 28 नॅनोमीटर.
 
  • सूक्ष्मजीवांचा आकार हा 100 मायक्रोमीटर पेक्षा लहान असतो .
  • सूक्ष्म जीवांच्या पेशीतील अंगके सर्व जीवन प्रक्रिया घडवून आणतात.
  
सूक्ष्मजीवांची वाढ -  Growth of Microorganisms –
  • प्रत्येक सूक्ष्म जीवाला वाढ व प्रजनन होण्यासाठी विशिष्ट परिस्थितीची आवश्यकता असते.
  •  काही सूक्ष्मजीवांना वाढीसाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते,
  •  तर काही ऑक्सिजन शिवाय वाढू शकतात. 

 सूक्ष्मजीवांची वाढ कोठे होते? 
  • माध्यम - माती ,पाणी,  कुजणारे पदार्थ इत्यादी 
  • तापमान - 25° ते 37 अंश c दरम्यान 
  • पोषण - विशिष्ट पोषणद्रव्ये 
  • उदाहरणार्थ -  शैवाल, हरितद्रव्य ,ऑक्सिजन वातावरण ,ओलसर, दमट तसेच उबदार.
  •  आकार व जीवन प्रक्रियेनुसार सूक्ष्म जीवांचे वर्गीकरण- शैवाल ,कवके आदीजीव, जिवाणू व विषाणू यांमध्ये केले जाते .
बहुपेशीय सूक्ष्मजीव - Multicellular microorganisms
  • पावावर येणारी बुरशी, डबक्यातील सेवालाचे तंतू हे बहुपेशी सूक्ष्मजीव आहेत.
एकपेशीय सूक्ष्मजीव- Unicellular microorganism
  •  जिवाणू, विषाणू या सूक्ष्मजीवांच्या पेशींची रचना थोडीशी भिन्न असते.
  •  या पेशीत दृश्यकेंद्रकी पेशीत आढळणारी पटलापासून तयार झालेले अंगके आढळत नाहीत.
  •  यात फक्त प्रद्रव्यपटल पेशीद्रव्य व केंद्रक द्रव्य एवढेच घटक आढळतात. म्हणूनच यांना आधी केंद्रकी पेशी म्हणतात.
सूक्ष्म जीवांचे प्रकार- Types of Microorganisms
1] उपयुक्त सूक्ष्मजीव - 
A] लॅक्टोबॅसिलाय जिवाणू 
  • लॅक्टोबॅसिलाय जिवाणू दुधातील शर्करेचे किण्वन प्रक्रियेद्वारे लॅक्टिक आम्लामध्ये रूपांतर करून दुधाचे दह्यात रूपांतर होते.
  •  लॅक्टिक आम्लामुळे दह्याला विशिष्ट असा आंबट स्वाद येतो.
  •  आपल्या पदार्थात लॅक्टोबॅसल्यासारखे उपयुक्त सूक्ष्मजीव वापरलेले असतात असे खाद्य शरीरासाठी आरोग्यदायक ठरतात. कारण हे सूक्ष्मजीव अन्न मार्गातील क्लास्टेडियम सारख्या घातक जीवांना नष्ट करतात व आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवतात .
  • पचन संस्थेच्या कार्यात बिघाड झाल्यास लॅक्टोबॅसिलाय व इतर काही सूक्ष्मजीवांचा उपयोग होतो. 
  • मद्यार्क  निर्मिती तसेच काही प्रकारचे पाव बनवताना लॅक्टोबॅसिलाय किण्वन प्रक्रिया वापरली जाते. 
  • गाई म्हशींना दिले जाणारे आंबोन म्हणजे लॅक्टोबॅसिलाय च्या मदतीने आंबवलेले अन्न असते .
B] रायझोबियम सहजीवी जिवाणू 
  • मुळांवरील गाठीत राहणारे रायझोबियम त्या रोपट्याला नायट्रेटस, नायट्रइट्स तसेच अमिनो आम्ले पुरवतात.
  •  रायझोबिया हवेतील नायट्रोजन पासून नायट्रोजनची संयुगे बनवतात .
  •  नायट्रोजन युक्त संयुगामुळेच डाळी कडधान्य प्रथिनांचा उत्कृष्ट स्त्रोत ठरतात.
C] किण्वन -
  • सूक्ष्मजीवांच्या क्रियेमुळे काही कार्बनी पदार्थांचे दुसऱ्या कार्बनी पदार्थात रूपांतर होण्याच्या रासायनिक क्रियेला किण्वन किंवा आंबणे किंवा कुजणे असे म्हणतात.
  • या क्रियेत उष्णता निर्माण होऊन कार्बन डाय-ऑक्साइड व इतर वायू तयार होतात .
  • हे वायू पदार्थाचे आकारमान वाढवतात.
  •  असिटीक आम्ल, सायट्रिक आम्ल, लॅक्टिक आम्ल, जीवनसत्वे व प्रतिजैविके यांच्या निर्मितीमध्ये किण्वन प्रक्रियेचा उपयोग केला जातो.
D] प्रतिजैविके 
  • शरीरातील रोगजंतूचा नाश करण्यासाठी व त्यांची वाढ रोखण्यासाठी देण्यात येणाऱ्या औषधांना प्रतिजैविक म्हणतात.
  • प्राणी व वनस्पतींना होणाऱ्या रोगांवरही प्रतिजैविकांमुळे नियंत्रण ठेवता येते. 
  • पेनिसिलिन हे जगातील  पहिले प्रतिजैविक आहे.
  •  याचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग या शास्त्रज्ञाने लावला.
2] उपद्रवी सूक्ष्मजीव -
  • कवके म्हणजे बुरशी हे उपद्रवी सूक्ष्मजीव आहेत.
  •  स्वतःचे पोषण करताना काही सूक्ष्मजीव विषारी पदार्थ  अँटॅरोटॉक्सिन्स अन्नात मिसळतात .
  • या पदार्थांनी अन्न दूषित होते म्हणजे त्या अन्नावर बुरशी येते.
  •  असे पदार्थ खाल्ल्यास आपल्याला उलट्या व जुलाब होतात.