रक्षाबंधन - सण बहीण भावाच्या नात्याचा



 रक्षाबंधन - उत्सव बहीण भावाच्या नात्याचा,त्यांच्या प्रेमाचा, उत्सव स्नेहाचा.

      भारतीय संस्कृती मध्ये अनेक सण साजरे केले जातात.प्रत्येक सणाचे वेगळे महत्व आहे.प्रत्येक सणाला काहीतरी पार्श्वभूमी आहे.कोणत्याही सणाला प्रत्येकाच्या घरी चैतन्यमय वातावरण असते. सगळेजण आनंदात तो सण साजरा करत असतात. गरीब असेल श्रीमंत असेल प्रत्येक जण आपापल्या परीने कोणताही सण साजरा करतात.

           महाभारतामध्ये एक अख्याईका आहे. श्रीकृष्णाच्या बोटाला जखम होऊन त्यातून रक्त वाहत असते.हे जेव्हा द्रौपदी पाहते तेव्हा द्रौपदीने आपल्या साडीची किनार फाडून श्रीकृष्णाच्या बोटाला बांधली होती.श्रीकृष्ण द्रौपदीला बहीण मानत असतं.

       युधिष्ठीर दुर्योधनाशी द्यूतात द्रौपदी हरला. दुर्योधनाने मग दुष्यासनाला सांगितले की द्रौपदीला धरून ओढत दरबारात आणावे. तिथे आणल्यावर दुर्योधनाने दुष्यासनाला सांगितले की द्रौपदीला विवस्त्र करा. द्रौपदीने सर्वांकडे मदत मागितली, सर्वांना दया याचना केली- आपले पती, भीष्म पितामह, राजा धृतराष्ट्र, या सर्वांना विनंती केली.परंतु कोणीही हा अन्याय, अनर्थ थांबवण्याचा प्रयत्न केला नाहीच,मदतीला कोणी नाही आले. त्या क्षणी त्या ठिकाणी कृष्ण होते. त्यांनी शपथ घेतली की ते तिथे उपस्थित असलेल्या त्या सर्व लोकांचे प्राण घेईल ज्यांनी द्रौपदीच्या या बेअब्रू होण्याचा देखावा पाहिला. ज्यांनी तिची मदत केली नाही. कृष्णाने पांडवांचे देखील प्राण घेतला असता , परंतु द्रौपदीचे कुंकू, तिचे सौभाग्य असल्यामुळे ते वाचले असे म्हंटले जाते. पांडवांच्या व्यतिरिक्त एक आणखी व्यक्ती होती जी त्याच्या क्रोधापासून बचावली . ते होते कृपाचार्य. कारण जेव्हा द्रौपदी सगळ्यांकडे मदत मागत होती तेव्हा त्यांनी एक बोट दर्शवून तिला इशारा केला होता की सर्वांकडे मदतीची याचना करण्यापेक्षा त्या एका शक्तीकडे मदत माग. द्रौपदीला त्यांचा इशारा लगेच समजला आणि तिने स्वतःला कृष्ण्चरणी अर्पण केले. तेव्हा श्रीकृष्ण तिचे रक्षण करतो व द्रौपदीची इज्जत वाचवतो. असं मानलं जातं की तेव्हापासून बहीण भावाचा पवित्र असा रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो.

            हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. उत्तर भारतात हा सण राखी म्हणुन प्रसिद्ध आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दिर्घ आयुष्य व सुख लाभो मिळो म्हणुन प्रार्थना करतात. पुरातन काळात, जेव्हा स्त्री स्वतःस असुरक्षीत जाणते, तेव्हा ती अशा व्यक्तीस राखी बांधून भाऊ मानते, जो तिची रक्षा करील.

          इंद्राच्या राणीने आपल्या मनगटावर एक धागा बांधला होता. ज्याच्या सामर्थ्याने वज्रानुसार राक्षसाचा पराभव केला. तेव्हापासून त्याची स्मृती म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पध्दत आहे. तसेच ऐतिहासिक काळात चित्तोडच्या राणी कर्मवतीने हुमाँयू बादशहाला राखी पाठवली व हुमाँयू बादशहाने पण आपल्या या बहिणीचे परकीय आक्रमणापासून संरक्षण केले.

       आपल्या संस्कृतीत स्त्रीला देवी मानले आहे. अशी ही देवतुल्य स्त्री भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर टिळा लावते. हा टिळा फक्त मस्तकाच्या आदराचा नसून भावाच्या मस्तकातील सद्विचार वं सदबुद्धी जागृत राहण्यासाठीची पूजा आहे. सामान्य डोळ्यांनी जे पाहू शकत नाही ते सर्व विकार, भोग, लोभ, मत्सर, वासना, द्वेष,राग इत्यादींकडे भावाने आपल्या य तिसऱ्या डोळ्याने पहावे य हेतूने बहिण भावाला टिळा लावून त्रिलोचन बनविते. इतका त्या टिळयाचा खोल अर्थ आहे.

      राखीचा धागा हा देखील नुसताच सुताचा दोरा नसून ते एक शील, स्नेह, पवित्रतेचे रक्षण करणारे, सतत संयमी ठेवणारे पुर्षार्थाचे पवित्र बंधन आहे. ह्या एवढयाशा धाग्याने कित्येक मने जुळून येतात. त्यांना भावनांचा ओलावा मिळतो वं मन प्रफुल्लीत होते.बहिण भावाचे अतूट नाते त्यातील उलवा कायम राहतो.

रक्षाबंधन च्या विविध फोटो अपलोड करण्यासाठी खाली पहा.

CLICK HERE 

        एकमेकांना जोडणारा असा हा सण इतर कोणत्याही धर्मात संस्कृतीत नाही. सामाजिक ऐक्याची भावना जागृत ठेवण्यासाठी अशा प्रकारचे सण खूप महत्वाचे ठरतात. रक्ताच्या नात्याव्यतिरिक्त आपल्या मनाप्रमाणे नाती जोडण्यास ह्या सणामुळे समाजास वाव मिळतो. ज्या समाजात अशा प्रकारची एकरूपता, ऐक्य असते असा समाज सामर्थ्यशाली बनतो हाच या राखी पौर्णिमेचा संदेश आहे. हल्लीच्या धकाधकीच्या काळात लहानपणी चिंचा, बोरांवरून ते अगदी आईच्या बाजूला कोण झोपणार यावरून भांडणारे ताई-दादा आता परस्परांना ई-पत्र, फोन किंवा चॅटद्वारे भेटण्याचा व राखी पौर्णिमा एकत्र साजरा करण्याचा आनंद उपभोगतात.