महात्मा गांधी जयंती - QUIZ सोडवा

 



2 ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती.मोहनदास करमचंद गांधी हे त्यांचे पूर्ण नाव. महात्मा गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना ‘महात्मा’  उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत.सुभाषचंद्र बोस यांनी इ.स.1944 मध्ये पहिल्यांदा त्यांना ‘राष्ट्रपिता’ असे संबोधले, असे म्हणतात. गांधी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते. त्यांचा जन्मदिवस 2 ऑक्टोबर हा भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असते.


या निमित्ताने आपण Quiz सोडवून आपल्या ज्ञानात भर घालू.

Quiz सोडवून 100 पैकी किती गुण मिळतात ते लगेच पहा. चाचणी सोडवल्यानंतर view score वर click करा.

Quiz सोडवण्यासाठी खाली क्लिक करा.


https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeVK_qnK8cK-qimqCdj8tIWrfDya4cU7WEVI9d25nXfyzkaNA/viewform?usp=sf_link