सूर्यमाला, ग्रह, उपग्रह सविस्तर माहिती

 


आपली आकाशगंगा, सूर्यमाला, ग्रह, उपग्रह सविस्तर माहिती - Detailed information about our galaxy, solar system, planets, Sub  planets

  • आपल्या आकाशगंगेला मंदाकिनी या नावाने ओळखले जाते.
  • असंख्य तारे व त्यांच्या ग्रह मालिका यांच्या समूहास दीर्घिका म्हणतात.
  • आपली सूर्यमाला ज्या दीर्घिकेत आहे तिला आकाशगंगा म्हणतात.
  •  आपली आकाशगंगा ज्या दीर्घिकांच्या समूहामध्ये आहे त्या समूहाला स्थानिक दीर्घिकासमूह म्हणतात.
  • विश्वात अशा अनेक दीर्घिका आहेत.
  • आपल्या आकाशगंगेच्या जवळ असलेली दुसरी दीर्घिका देवयानी या नावाने ओळखली जाते.
  • एडमिन हबल या वैज्ञानिकाने आपल्या आकाशगंगेच्या बाहेर इतर अनेक दीर्घिका असल्याचे स्पष्ट केले.
  • नासा या अमेरिकन संस्थेने 1990 मध्ये हबल ही दुर्बीण पृथ्वीच्या कक्षेत सोडली.
  •  ताऱ्यांचा शोध घेणे, प्रकाश चित्रे घेणे व वर्णपट मिळवण्याचे काम त्यामुळे सोपे झाले.
  • सूर्यमाला
  • सूर्यमाले सूर्य ग्रह लघुग्रह उल्का यांचा समावेश होतो.

सूर्य

  • सूर्यमालेचा केंद्रस्थानी असलेला सूर्य पिवळ्या रंगाचा तारा आहे.
  •  सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे 6000 अंश सेल्सिअस आहे.
  •  सूर्य इतका मोठा आहे की त्यामध्ये पृथ्वी एवढे 13 लाख ग्रह सामावू शकतात.
  •  सूर्याच्या गुरुत्वीय बलामुळेच सूर्यमालेतील खगोलीय वस्तू त्याच्याभोवती फिरतात.
  •  सूर्याचा व्यास साधारणतः 13 लाख 92 हजार किलोमीटर एवढा आहे.

सूर्यमालेतील ग्रह [सूर्यापासून अंतराच्या क्रमाने ] - planets in the solar system

1]  बुध - Mercury

  • सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह म्हणजे बुध  आहे.
  • बुध हा सर्वात लहान ग्रह आहे.
  •  सूर्यापासून दूर असताना पृथ्वीवरून फक्त सकाळी आणि संध्याकाळी दिसतो.
  •  हा सर्वात वेगवान ग्रह आहे.
  • या ग्रहास एकही उपग्रह नाही.
  • हा सर्वात उष्ण ग्रह आहे. 
  • या ग्रहाला उपग्रह नाही.
  • बुध या ग्रहाचा परिवलन काळ 58.65 दिवस तर परिभ्रमण काळ 88 दिवस आहे.
  • बुध या ग्रहावर वातावरण नाही.

2] शुक्र -  Venus

  • सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह आहे. 
  • या ग्रहास पहाटतारा असेही म्हणतात.
  • हा पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह आहे.
  • सामान्यतः सूर्योदयाच्या आधी पूर्व दिशेस व सूर्यास्तानंतर पश्चिम दिशेस हा ग्रह दिसतो.
  • शुक्र स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.
  • शुक्र हा सर्वात तप्त  ग्रह आहे.
  • आपल्या चंद्राच्या जशा कला असतात तशा शुक्राच्या देखील कला असतात. 
  • शुक्राला उपग्रह नाही.
  • शुक्राचा परिवलन काळ 243 दिवस असून परिभ्रमण काल 225 दिवस इतका आहे.
  • शुक्रावर वातावरण नाही.

3] पृथ्वी - The Earth

  • सूर्यापासून तिसऱ्या क्रमांकावर पृथ्वी  आहे.
  •  पृथ्वी शिवाय इतर कुठल्याही ग्रहावर जीवसृष्टी नाही.
  • पृथ्वी स्वतः चुंबक असल्याने पृथ्वीभोवती चुंबकीय क्षेत्र आहे.
  •  या चुंबकीय क्षेत्रामुळेच सूर्यापासून येणारे हानिकारक किरण पृथ्वीच्या ध्रुवीय क्षेत्राकडे वळतात.
  •  पृथ्वीला एक उपग्रह आहे.
  •  पृथ्वीचा परिवलन काळ 24 तास तर परिभ्रमण काळ 365 दिवस आहे.
  • पृथ्वीचे स्वतःभोवती परिवलन ज्या अक्षाभोवती होते तो परिभ्रमण कक्षेला लंब नसून थोडा कललेला आहे त्यामुळेच पृथ्वीवर हिवाळा उन्हाळा हे ऋतू आढळतात.
  • पृथ्वी हा सर्वाधिक घनतेचा ग्रह आहे.

4] मंगळ - Mars

  •  हा सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे.
  •  मंगळावरील मातीत  लोह असल्याने त्याचा रंग लालसर दिसतो म्हणून त्याला लालग्रह असेही म्हणतात.
  • मंगळ ग्रहावर सूर्यमालेतील सर्वात उंच व लांब पर्वत ऑलिंपस मोंन्स आहे.
  • मंगळ या ग्रहाला दोन उपग्रह आहेत. [ 1. PHOBOS 2. DEIMOS ]
  •  मंगळ ग्रहाचा परिवलन काळ 24 तास 37 मिनिटे तर परिभ्रमण काळ 1.88 वर्ष इतका आहे.
  • मंगळावर वातावरण नाही.

5] गुरु Jupiter

  •  गुरु हा सूर्यमालेतील आकारमानाने  सर्वात मोठा ग्रह आहे.
  •  गुरु मध्ये सुमारे १३९७ पृथ्वीगोल सहज मावतील इतका तो मोठा आहे.
  • हा सर्वात जड ग्रह आहे.
  •  गुरु स्वतःभोवती फार वेगाने फिरतो.
  •  गुरु ग्रहावर सतत प्रचंड वादळे होत असल्याने त्यास वादळी ग्रह असेही म्हणतात.
  •  गुरुला ज्ञात 64 उपग्रह आहेत, परंतु दुर्बिणीतून फक्त ४ उपग्रह पाहू शकतो.
  •  गुरुचा परिवलन काळ 9 तास 56 मिनिटे इतका असून परिभ्रमण काळ 11.87 वर्ष इतका आहे.
  •  गुरु ग्रहावर वातावरण आहे तसेच गुरुला कडी आहे.

6] शनि  - Saturn.

  •  गुरुग्रहानंतर सर्वात मोठा ग्रह आहे.
  •  शनि या ग्रहाभोवती कडी आहे.
  • हा उघड्या डोळ्यांना दिसू शकणारा सर्वात लांबचा ग्रह आहे.
  •  त्याचे वस्तुमान पृथ्वीच्या 95 पट असतानाही त्याची घनता खूप कमी आहे.
  •  शनी जर एखाद्या मोठ्या समुद्रात टाकला तर तो चक्क तरंगू शकेल.
  •  या ग्रहाला 33 ज्ञात उपग्रह आहे.
  • शनीचा उपग्रह टायटन हा सर्व उपग्रहात मोठा उपग्रह आहे.
  •  शनी या ग्रहाचा परिवलन का 10 तास 40 मिनिटे तर परिभ्रमण काळ 29 वर्ष इतका आहे.
  •  शनि या ग्रहाला वातावरण आहे.

7] युरेनस 

  • युरेनस सूर्यमालेतील सातवा ग्रह असून या ग्रहाला दुर्बिणी शिवाय पाहता येत नाही.
  • युरेनस ग्रहाचा आस खूप कललेला असल्याने तो घरंगळत चालल्यासारखा दिसतो.
  • युरेनस या ग्रहाला 27 ज्ञात उपग्रह आहे.
  • याचा परिवलन काळ 17 तास 24 मिनिटे असून परिभ्रमण काळ 84 वर्ष आहे.
  • युरेनस वर वातावरण आहे.
  • शुक्रप्रमाणे पूर्वेकडून पास्चुमिकडे फिरतो.

8] नेपच्यून

  •  नेपच्यून हा सूर्यमालेतील आठवा ग्रह आहे.
  •  नेपच्यून वर एक ऋतू सुमारे 41 वर्षाचा असतो.
  •  या ग्रहावर अतिशय वेगवान वारे वाहतात.
  •  नेपच्यून या ग्रहाला  तेरा ज्ञात उपग्रह आहेत.
  •  याचा परिवलन काळ  16 तास 11 मिनिटे तर परिभ्रमण काळ 164 वर्षे इतका आहे.

  •  बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ हे अंतर्ग्रह आहेत तर गुरु,शनी, युरेनस व  नेपच्यून हे सर्व बहिर्ग्रह आहेत.
  •  सर्व बहिर्ग्रहाणभोवती कडे आहेत.
  • सर्व बहिरग्रहांचे बाह्य आवरण हे वायुरूप असते.


उपग्रह - Sub planet

  • सूर्याभोवती स्वतंत्रपणे न फिरता विशिष्ट ग्रहांभोवती  फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंना उपग्रह म्हणतात.
  •  ग्रहांसारखे उपग्रह हे सुद्धा स्वतःच्या अक्षावर स्वतःभोवती फिरतात.
  • चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह असून त्याच्यावर वातावरण नाही.
  • बुध व शुक्र हे दोन ग्रह सोडताले  इतर सर्व ग्रहांना उपग्रह आहेत.
  •  चंद्राचा परिभ्रमण काळ आणि परिवलन काळ 27.3 दिवस आहे. 
  • उपग्रहांपैकी टायटन हा सर्वात मोठा उपग्रह आहे.


लघुग्रह - Asteroid

  • सूर्यमालेतील ग्रहांच्या निर्मितीच्या वेळेस ग्रह बनण्यास निष्फळ ठरलेल्या लहान लहान खडकांना लघुग्रह म्हणतात.
  •  मंग आणि गुरु या ग्रहांच्या दरम्यान खगोलीय वस्तूंचा पट्टा निर्माण झाला आहे.
  •  सर्व लघुग्रह सूर्याभोवती परिभ्रमण करतात.


बटुग्रह dwarf planet

  • सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारे लहान आकाराची खगोलीय वस्तू म्हणजे बटुग्रह होय.
  • प्लुटो  हा अगोदर ग्रह होता परंतु याचा ग्रहाचा दर्जा काढून त्याला बटुग्रहात समावेश केला आहे.
  • आंतरराष्ट्रीय खगोल समितीने केलेल्या परिभ्रमण कक्षेच्या नियमात प्लुटोचे परिभ्रमण ग्राह्य नसल्याने त्याला आता ग्रह मानले जात नाही.
  • प्लुटोला सूर्याभोवती फेरी मारण्यास 248 वर्ष लागतात तर परिवलनास 6.38 दिवस लागतात.


धूमकेतू comet

  •  धूमकेतू म्हणजे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारे अशनी  गोल होय,
  •  धूमकेतू हे धूळ व बर्फ यांच्यापासून तयार झालेले असून आपल्या सूर्यमालेचा एक घटक आहे.
  • धूमकेतू गोठलेल्या द्रव्यांनी व धुलीकणाने बनलेले असतात.
  •  सूर्याच्या उष्णतेमुळे धूमकेतूतील द्रव्यांचे वायूत रूपांतर होते.
  •  हे वायू सूर्याच्या विरुद्ध दिशेस फेकले जातात.
  •  त्यामुळे काही धूमकेतून लांबट पिसाऱ्यासारखे दिसतात.
  •  धूमकेतू सूर्याभोवती फिरतात.

 धूमकेतूनचे मुख्य दोन प्रकार आहेत - 

  •  दीर्घ मुदतीचे धूमकेतू : या धूमकेतून ना सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 200 वर्षापेक्षा अधिक कालावधी लागतो.
  • अल्पमुदतीचे धूमकेतू : या धूमकेतून ना सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 200 वर्षापेक्षा कमी कालावधी लागतो.

  1. हलेचा  धूमकेतूचे १९१०, १९८६ साली पुनरागमन झाले होते.
  2. तो आता 2062 साली दिसण्याची अपेक्षा आहे.
  3. हलेचा धूमकेतूचा  केंद्रभाग 16 किलोमीटर लांब व 7.5 किलोमीटर रुंद आढळून आला हलेचा धूमकेतूला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 76 वर्षे लागतात.

  • फ्रेड व्हिपल या खगोल निरीक्षकांनी धूमकेतूची रचना विविध घटकांच्या बर्फाळ समुच्चयाने  बनलेली असावी असे प्रतिपादन केले.
  •  1950 पर्यंत त्यांनी सहा धूमकेतू शोधून काढले होते.
  •  या माहितीवर आधारित धूमकेतूचे डर्टी स्नोबॉल असे नामकरण झाले.


 उल्का 

  • कधी कधी आकाशातून एखादा तारा तुटून पडल्यासारखा दिसतो या घटनेला उल्कापात म्हणतात.
  • अनेक वेळा या उल्का म्हणजे लघुग्रहांच्या पट्ट्यातून येणारे शिलाखंड असतात.
  • मात्र जे छोटे शिलाखंड पृथ्वीच्या वातावरणात आल्यावर त्याच्याशी होणाऱ्या घर्षणाने पूर्णपणे जळतात त्यांना उल्का म्हणतात.
  • काही वेळेस उल्का पूर्णतः न जळतात पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतात त्यांना अशनी  असे म्हणतात.
  • महाराष्ट्रातील लोणार सरोवर अशाच अशनी आघाताने  तयार झाले आहे.
  • पृथ्वीप्रमाणेच इतर खगोलीय वस्तूंवर देखील उल्कापात आणि अशनीपात होतात.

ध्रुवतारा

  • ध्रुवतारा फक्त उत्तर गोलार्धातूनच दिसतो.
  • तो उत्तर दिशा दर्शवितो.
  •  हा सूर्यमालेतून दिसणारा सर्वात महत्त्वाचा तारा आहे.
  •  ध्रुवतारा विश्वात स्थिर दिसतो.   

ग्रह, उपग्रह, बटुग्रह यावर आधारित सराव चाचणी सोडवा