मानवी अस्थिसंस्था सविस्तर माहिती

मानवी अस्थिसंस्था सविस्तर माहिती Detailed information on the human skeletal system


  • खालील सर्व प्रश्न काळजीपूर्वक वाचून त्यांच्या उत्तरासाठी खाली दिलेले मुद्दे सविस्तर अभ्यासा.
  • सर्व संकल्पना व्यवस्थित स्पष्ट होण्यासाठी खाली प्रश्न समजून घेऊन त्यांचे उत्तरे वहीत लिहून काढा. विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनासाठी हे खूप महत्त्वाची बाब ठरेल.
  • अक्षय सांगड्यामध्ये शरीरातील कोणत्या गोष्टींचा समावेश होतो?

  • हात पाय या हाडांचा समावेश कोणत्या प्रकारच्या सांगाड्यामध्ये होतो?
  • कवटी मध्ये एकूण किती हाडे असतात?
  • डोक्याची व चेहऱ्याची हाडे मिळून काय?
  • उरोस्थी हे हाड कोठे असते?
  • छातीच्या पिंजऱ्यात किती हाडे असतात?
  • मेंदूतून निघणाऱ्या चेतारज्जू चे संरक्षण कोण करते?
  • ज्या हाडांची हालचाल होते त्याला कोणत्या प्रकारचे सांधे म्हणतात?
  • कोणत्या सांध्यांची हालचाल 360 अंश कोणात होते?
  • त्वचेचा कोणता भाग शरीराचे तापमान नियंत्रित करण्याचे काम करतो?
  • धर्म ग्रंथी म्हणजे काय?
  • शरीरातील आर्द्रता राखून ठेवण्याचे काम कोण करते?
  • आपल्या शरीरातील केसांचा रंग कोणत्या घटकामुळे ठरतो?
  • भुरे पांढरे केस हे कशामुळे तयार होतात?
  • आपल्या तळ हातामध्ये एकूण किती हाडे असतात?
  • आपल्या शरीरातील सर्वात लहान हाड कोणते?
  • आपल्या शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते?

आपली अस्थिसंस्था -Skeletal system

  • अस्थी  म्हणजे हाड.
  • कधी कधी खेळताना पडल्यानंतर हाताचे किंवा पायाच्या हाड मोडते यालाच अस्थिभंग असे म्हणतात.
  • अस्थिभंग झाल्यानंतर त्या भागाची क्ष किरण प्रतिमा काढली जाते.
  • क्ष किरण प्रतिमेचा शोध रौंटजैन यांनी लावला आहे.
  • शरीरातील सर्व हाडे व कूर्चा एकत्र मिळून अस्थिसंस्थेची रचना होते.

  1. हाडांची रचना मुख्यत्वे दोन घटकांनी बनलेले असते.
  2. अस्थिपेशी या जैविक असतात तर कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम फॉस्फेट, खनिज, क्षार यासारख्या अजैविक पदार्थापासून हाडे बनतात.
  3. कॅल्शियम मुळे हाडांना मजबूतपणा येतो.
  4. शरीराला निश्चित आकार देऊन आधार देणाऱ्या तसेच शरीराच्या आतील नाजूक इंद्रियांचे रक्षण करणाऱ्या संस्थेला अस्थिसंस्था म्हणतात.
  5. हाडांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला Osteology म्हणतात.
  6. शरीराच्या वजनाच्या 18.1% हाडांचे वजन असते.
  7. लहान अर्बकामध्ये 350 हाडे असतात तर प्रौढ माणसात 206 हाडे असतात.

आपल्या शरीरातील हाडांचे आकारानुसार प्रामुख्याने चार प्रकार पडतात.

  1. चपटी हाडे.
  2. लहान हाडे. 
  3. अनियमित हाडे.
  4.  लांब हाडे.

मानवी अस्थिसंस्था ही दोन भागांमध्ये विभागली जाते.

  1. अक्षय सांगाडा.
  2.  उपांग सांगाडा

  1. अक्षय सांगाडा -

  • अक्षय सांगाड्यामध्ये कवटी, पाठीचा कणा व छातीच्या पिंजऱ्याचा समावेश होतो.
  •  ते सर्व शरीराच्या मध्यभागातून जाणाऱ्या रेषेभोवती असतात.

  1.  उपांग सांगाडा

  • उपांग सांगाडा हा या मध्यरेषेच्या बाजूंच्या हाडांचा मिळून तयार झालेला असतो.
  • यामध्ये हात पाय या हाडांचा समावेश होतो.

  1. अक्षीय सांगाडा

१] कवटी

  •  डोक्याची व चेहऱ्याची हाडे मिळून कवटी बनते.
  •  यातील हाडे आकाराने सपाट व मजबूत असतात,
  •  डोक्यात 8 आणि चेहऱ्यामध्ये 14 अशी एकूण 22 हाडे कवटीमध्ये असतात,
  •  कवटीमधील खालचा जबडा सोडून इतर हाडांची हालचाल होत नाही.

२[ छातीचा पिंजरा

  • छातीमधील पिंजऱ्यासारखी रचना असणाऱ्या भागाला छातीचा पिंजरा असे म्हणतात.
  •  छातीत एक उभे चपटे हाड असते त्याला उरोस्थी म्हणतात.
  • त्याला आडव्या चपट्या बरगड्यांच्या बारा जोड्या जोडलेल्या असतात या 25 हाडांचा मिळून छातीचा पिंजरा तयार होतो.
  • तो मागून पाठीच्या कन्याला जोडलेला असतो.

३] पाठीचा कणा

  • कुलपासारखी आकाराची हाडे एकमेकांशी उभी सरळ जोडून पाठीचा कणा तयार होतो.
  • पाठीच्या कण्यात एकूण 33 हाडे असतात.
  •  त्यातील प्रत्येकाला मनका म्हणतात.
  •  ही सर्व हाडे लवचिक असून एकावर एक अशी रचलेली असतात.
  •  पाठीचा कणा मेंदूतून निघणाऱ्या चेतारज्जू चे संरक्षण करतो.

२] उपांग सांगाडा

१] हात व पाय

  • हात व पायांच्या विविध भागांमध्ये अनेक हाडे असतात.
  •  ती एकमेकांना सांध्यांनी जोडलेली असतात.

२] सांधा

 ज्या ठिकाणी दोन किंवा दोनपेक्षा जास्त हाडे जोडलेली असतात त्या जोडणी ला सांधा म्हणतात.

सांधे दोन प्रकारचे असतात.

१] चल साधा

हाडांची हालचाल होते याला चल सांधा म्हणतात.

 उदा. हात पाय यातील हाडे.

२] अचल सांधा

 हाडांची हालचाल होत नाही याला अचल सांधा म्हणतात.

 उदा. कवटीची हाडे.

चल सांध्याचे प्रकार

१] बिजागिरीचा सांधा

  •  या प्रकारच्या सांध्यांमध्ये हाडांची हालचाल एकाच दिशेने शक्य होते.
  •  या सांध्यांची हालचाल 180 अंश कोनात होते.
  • उदा. कोपर व गुडघा

२] उखळीचा सांधा 

  • या प्रकारच्या सांध्यांमध्ये हाडांची हालचाल दोन किंवा अधिक दिशांनी होते.
  •  या सांध्यांची हालचाल 360 अंश कोणात होते.
  •  उदा. खांदा,खुबा.

३] सरकता सांधा 

या प्रकारच्या सांध्यांमध्ये हाडे फक्त एकमेकांवर सरकु शकतात.

 उदा. मनगट, पायाचा घोटा या मधील सांधे.


त्वचा

  • त्वचाही सर्व सजीवांच्या शरीराचा एक महत्त्वाचा व मोठा अवयव आहे.
  • शरीराच्या बाह्य आवरणाला त्वचा म्हणतात.
  • मानवी त्वचा ही मुख्यत्वे दोन थरांची बनलेले असते.
  •  सर्वात वरच्या थराला बाह्य त्वचा म्हणतात, तर त्याखाली थराला अंत त्वचा म्हणतात.
  •  त्याखाली रक्तवाहिन्या व मज्जातंतूचे जाळे असते.
  •  त्याच्या खाली उपत्वचीय थर असतो तो शरीराचे तापमान नियंत्रित करण्याचे काम करतो.
  • आपल्या त्वचेमध्ये घाम तयार करणाऱ्या ग्रंथी असतात त्यांना धर्मग्रंथी म्हणतात.
  • बाह्य त्वचेचा सर्वात जाड स्तर तळपायावर व तळहातावर असतो. या दोन्ही ठिकाणी त्याची जाडी 1.5 मि.मी. इतकी असते.

त्वचेची कार्य

  1. शरीराच्या अंतरंगाचे - जसे स्नायू, हाडे, इंद्रिय संस्था इत्यादींचे रक्षण करणे.
  2.  शरीरातील आर्द्रता राखून ठेवण्यास मदत करणे.
  3.  ड जीवनसत्त्वाची निर्मिती करणे.
  4.  शरीरातील घाम बाहेर टाकून शरीरातील तापमानावर नियंत्रण ठेवणे.
  5. उष्णता थंडी यांपासून संरक्षण करणे.
  6. त्वचा स्पर्श इंद्रिय म्हणून कार्य करते.

मेलानिन

  • आपल्या केसांचा रंग मेल्यानींमुळे ठरतो.
  • त्वचेच्या थरामधील पेशीत मेलानिन  नावाचे रंगद्रव्य असते.
  • मेल्यानीन त्वचेतील विशिष्ट ग्रंथी तयार होते.
  • मेल्यानींच्या प्रमाणावरून त्वचेचा गोरेपणा काळेपणा ठरतो.
  • मेल्यानीन त्वचेचे व आतील भागांचे अतिनिल किरणांपासून संरक्षण करते.
  • काळे गडद केस हे शुद्ध मेल्यानींमुळे तर भुरे पांढरे केस मेलेनिन मधील गंधकामुळे आणि तांबडे केस मेल्यानिन मध्ये लोह असल्याने आपल्याला पाहायला मिळतात.

आपल्या शरीरातील हाडे -

 हातातील हाडे

 एका तळहातामध्ये 13 हाडे असतात बोटांमध्ये एकूण 14 हाडे असतात.

पायातील हाडे

  •  मांडीमध्ये femur हे हाड असते.
  • मानवी शरीरातील सर्वात लांब आणि मजबूत हाड म्हणून याची ओळख आहे त्याला उर्विका असेही म्हणतात.

तळपायात एकूण बारा हाडे असतात तर पायांच्या बोटांमध्ये एकूण 14 हाडे असतात.

पाठीचा मणका

  • मणक्यामध्ये एकूण 33 हाडे असतात.
  • परंतु माकड हाड आणि त्रिकास्ती हे जोडून असल्याने मणक्यात 26 हाडे गृहीत धरतात.
  • छातीच्या पिंजराच्या बरगड्यात एकूण 24 हाडे असतात.

कानातील हाडे

  • प्रत्येक कानात तीन-तीन हाडे असतात.
  • त्यातील कडी Stirrup हे कानातील हाड आपल्या शरीरातील सर्वात लहान हाड आहे.
  •  ते तांदळाच्या दाणे एवढे व पोकळ असते.
  • त्याचा आकार कडी सारखा असतो.         

रक्ताभिसरण संस्था सविस्तर माहिती वाचण्यासाठी खाली पहा. Circulation Institute Detailed Information