प्रकाश - या विषयी सविस्तर माहिती

प्रकाश - या विषयी सविस्तर माहिती

दिलेले सर्व मुद्दे काळजीपूर्वक अभ्यासून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

सर्व प्रश्नांची उत्तरे अचूक काढण्यासाठी सर्व भाग काळजीपूर्वक अभ्यासा.

  1.  प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय?
  2. पारदर्शक पदार्थ म्हणजे काय?
  3. सर्वात मोठी सूर्य तबकडी कोठे आहे?
  4. राष्ट्रीय विज्ञान दिन कोणता?
  5. कोणत्या वर्षापासून राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो?
  6. मेणबत्ती भिजवताना ओठांचा चंबू का करावा लागतो?
  7. सर्वात जास्त विकिरण कोणत्या रंगाचे होते?
  8. सूर्यग्रहण कधी होते?
  9. खंडग्रास सूर्यग्रहण म्हणजे काय?
  10. खग्रास सूर्यग्रहण म्हणजे काय?
  11. दीप्ती मान पदार्थ म्हणजे काय?
  12. सूर्य सोडून इतर प्रकाशाचे नैसर्गिक स्त्रोत कोणते?
  13. आकाश निळे का दिसते?
  14. चंद्रग्रहण म्हणजे काय?
  15. पिधान म्हणजे काय?
  16. प्रकाश हे कोणते तरंग असतात?
  17. प्रकाशाचे अपसरण म्हणजे काय?
  18. भिंगाच्या शक्तीचे एकक कोणते?
  19. डोळ्याचा कोणता भाग बाहुली वर नियंत्रण ठेवतो?
  20. डोळ्यातील भिंग म्हणजे काय?
  21. आपल्याला कोणत्या पेशी विविध रंगांची जाणीव करून देतात?
  22. निरोगी डोळ्यासाठी सुस्पष्टदृष्टीचे लघुत्तम अंतर किती?


दीप्तीमान वस्तू किंवा पदार्थ

  • ज्या वस्तू किंवा पदार्थ प्रकाश बाहेर टाकतात म्हणजेच त्या स्वतः प्रकाशाचे स्त्रोत किंवा उगमस्थान आहेत त्यांना दीप्तीमान वस्तू किंवा पदार्थ म्हणतात.
  • ज्या वस्तू स्वतः प्रकाशाचे स्त्रोत नाहीत त्यांना दीप्तीहीन वस्तू म्हणतात.
  • काही मानवनिर्मित पदार्थ किंवा वस्तू प्रकाश देतात त्यांना प्रकाशाचे कृत्रिम स्त्रोत म्हणतात.
  • सूर्य हा प्रकाशाचा मुख्य स्त्रोत आहे.
  •  आकाशात रात्री दिसणारे इतर तारे तसेच काजवे, अंगलरफिश, हनी मशरूम हे प्रकाशाचे नैसर्गिक स्रोत आहेत.

प्रकाशाच्या सरळ दिशेतील प्रवासाला प्रकाशाचे रेषीय संक्रमण असे म्हणतात.

प्रकाशाचे परावर्तन 

प्रकाश स्त्रोतापासून वस्तूवर पडणारे प्रकाश किरणे वस्तूच्या पृष्ठभागापासून परत फिरतात याला प्रकाशाचे परावर्तन म्हणतात.

तारे स्वयंप्रकाशी आहेत तर ग्रह उपग्रह परप्रकाशी आहेत.

  • ज्या पदार्थातून प्रकाश आरपार जातो तो पारदर्शक पदार्थ होय.
  •  ज्या पदार्थातून प्रकाश आरपार जात नाही तो अपारदर्शक पदार्थ होय.
  •  ज्या पदार्थातून प्रकाश काही प्रमाणात आरपार जातो तो अर्ध पारदर्शक पदार्थ होय.


  • एखाद्या वस्तू मधून प्रकाश आरपार जात नाही तेव्हाच त्या वस्तूची छाया निर्माण होते.
  • छायेचे स्वरूप हे प्रकाशाचा स्त्रोत वस्तू आणि पडदा यांच्या परस्परांमधील अंतर व दिशेवर अवलंबून असते.
  • एखाद्या वस्तूच्या सूर्यप्रकाशातील छायेचे मात्रा व दिशा यांच्या मदतीने वेळ दर्शवणारे उपकरण म्हणजे सूर्य तबकडी.
  • सर्वात मोठी सूर्य तबकडी जंतर-मंतर नवी दिल्ली येथे आहे.


       भारतीय शास्त्रज्ञ सर सी. व्ही. रामन यांनी सादर केलेल्या प्रकाशाच्या विकीरणासंबंधीचे संशोधन रामन परिणाम म्हणून ओळखले जाते.

त्यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी हा शोध लावला त्या शोधाच्या स्मरणार्थ 1987 सालापासून 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो.


  • न्यूटन यांनी न्यूटन तबकडी बनवली.
  •  न्यूटनने प्रकाशाविषयी ऑप्टिक्स हा ग्रंथ लिहिला.

मेणबत्ती विजवताना ओठांचा चंबूच का करावा लागतो?

     मेणबत्ती विजवताना आपण त्यावर फुंकर घालतो ओठांचा चेंबू केल्याने तोंडातून हवा बाहेर पडण्यासाठी क्षेत्रफळ कमी होते व हवेवर जास्त दाब येऊन मेणबत्ती विझते.

आकाश निळे का दिसते?

     वातावरणातील नायट्रोजन व ऑक्सिजन सारख्या वायूंच्या रेणूमुळे सूर्यप्रकाशाचे विकिरण होते त्यातील निळ्या रंगाचे विकिरण सर्वात जास्त होते म्हणून आकाश निळे दिसते.

सूर्यग्रहण 

  • जेव्हा सूर्य चंद्र पृथ्वी एका सरळ रेषेत येतात तेव्हा ग्रहण लागले असे म्हणतात.
  • सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये जेव्हा चंद्र येतो तेव्हा चंद्राची सावली पृथ्वीवर पडते तेवढ्या भागातून सूर्य दिसत नाही त्याला सूर्यग्रहण म्हणतात.
  • सूर्यग्रहण नेहमी अमावस्येलाच दिसते.
  • सूर्यग्रहण आंशिक  किंवा पूर्ण असते.
  • काही वेळा सूर्यबिंब चंद्रामुळे पूर्णपणे झाकले जाते तेव्हा खग्रास सूर्यग्रहण होते.
  • जेव्हा सूर्यबिंब चंद्रामुळे पूर्णपणे झाकले जात नाही तेव्हा खंडग्रास सूर्यग्रहण होते.
  • सूर्यग्रहणाच्या वेळी हानिकारक अतिनील किरण पृथ्वीवर पोहोचतात त्यामुळे सूर्यग्रहण हे उघड्या डोळ्यांनी कधीही बघू नये.

चंद्रग्रहण

  • सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी आली की पृथ्वीची छाया चंद्रावर पडते व चंद्राचा काही भाग झाकला जातो त्याला चंद्रग्रहण म्हणतात.
  • चंद्रग्रहण फक्त पौर्णिमेलाच दिसते.
  • पृथ्वीच्या सावलीत पूर्ण चंद्र आला तर खग्रास चंद्रग्रहण घडते.
  • चंद्राच्या काही भागावर पृथ्वीची छाया पडली तर खंडग्रास चंद्रग्रहण घडते.

      पृथ्वीवरून पाहता जेव्हा चंद्राच्या मागे एखादा ग्रह किंवा तारा जातो तेव्हा त्या स्थितीला पिधान म्हणतात.

शून्य छाया दिन

  • ज्या दिवशी सूर्य बरोबर माथ्यावर येतो त्या दिवसाला शून्य छाया दिन म्हणतात.
  • या दिवशी मध्यानाच्या सुमारास सावली नाहीशी होते.   

प्रकाश म्हणजे दृष्टीची संवेदना निर्माण करणारे विद्युत चुंबकीय प्रारणे होय.

प्रकाश हा अवतरंग आहे

प्रकाशाचे अपसरण

  • जेव्हा एकाच बिंदू स्त्रोतापासून प्रकाश किरण एकमेकांपासून दूर पसरतात तेव्हा प्रकाशाचे अपसरण होते.
  • प्रकाश पसरविण्यासाठी याचा उपयोग होतो. उदा. दिवे टेबल लॅम्प.

प्रकाशाचे अभिसरण

  • जेव्हा प्रकाश किरण एका बिंदूपाशी एकत्र येतात तेव्हा प्रकाशाचे अभिसरण होते.
  • अशा प्रकारचा प्रकाश होतो वापरून डॉक्टर दात कान डोळे इत्यादी पाहू शकतात.
  • सौर उपकरणातही प्रकाशाचे अभिसरण याचा उपयोग होतो.

 भिंगाच्या शक्तीचे एकक डायॉक्टर आहे.

जर नाभीय अंतर मीटर मध्ये व्यक्त केले असेल तर भिंगाची शक्ती डायॉप्टर मध्ये व्यक्त करतात.

 मानवी डोळा

१] पार पटल 

  • अत्यंत पातळ पारदर्शक पटल असतो त्यास पार पटल म्हणतात.
  • या पटलातून प्रकाश डोळ्यात प्रवेश करतो प्रकाशाचे अपवर्तन इथेच घडते.

२] बुबुळ

  •  आपणास जो डोळ्यातला गडद मांसल  भाग दिसतो त्यास बुबुळ म्हणतात.
  • बुबुळाच्या वरचा पारदर्शक भाग म्हणजे पारपटल होय.
  • बुबुळ हे बाहुलीवर नियंत्रण ठेवते.

३] डोळ्याची बाहुली.

  • बुबुळ  च्या मध्यभागी बदलत्या व्यासाचे एक छिद्र असते त्यालाच बाहुली म्हणतात.

४] भिंग

  • डोळ्याच्या बाहुलीच्या लगतच पाठीमागे पारदर्शक द्वीबहिर्वक्र स्फटिकमय भाग असतो त्यास भिंग म्हणतात.

५] दृष्टीपटल

  • यावर वास्तव आणि उलट्या प्रतिमा तयार होतात.
  • हा पडदा प्रकाश संवेदनशील असतो. यामध्ये प्रकाश संवेदनशील पेशी असतात.
  • शंकू पेशी ज्या विविध रंगांची जाणीव करून देतात.
  • दंडक पेशी ज्या अंधारात मदत करतात.


     निरोगी डोळ्यापासून ज्या कमीत कमी अंतरावर वस्तू असताना सुस्पष्टपणे व डोळ्यावर ताण  न येता दिसू शकते त्यानंतर सुस्पष्टदृष्टीचे लघुत्तम अंतर म्हणतात.

निरोगी डोळ्यासाठी हे अंतर सुमारे 25 सेंटीमीटर आहे.

नेत्रदान

  • माणसाचा मृत्यू झाल्यानंतरही काही काळ डोळे जिवंत राहतात.
  •  नेत्रदान केल्याने लाखो लोकांना दृष्टी मिळू शकते.
  • व्यक्तीच्या मृत्यूनंतर पहिल्या चार ते सहा तासात डोळा काढून नेत्र बँकेत जमा करावा लागतो.
  • दहा ते पंधरा मिनिटात डोळा काढता येतो.

       इंद्रधनुष्य ही नैसर्गिक क्रिया प्रकाशाचे अपस्करण अपवर्तन व परावर्तन या तीनही गोष्टीमुळे घडून येते.


प्रकाश या घटकावर आधारित सराव चाचणी सोड

CLICK HERE.