चांद्रयान - 3 ची SOFT LANDING पूर्वीची चित्त थरारक 20 मिनिटे

   


 


      चांद्रयान - 3 ची  SOFT LANDING पूर्वीची चित्त थरारक 20 मिनिटे 

           लहानपणापासून ज्या चांदोबाच्या काल्पनिक गोष्टी आपण ऐकत आलो. त्या चंद्राची आता भारताची प्रत्यक्ष गळाभेट होण्याचा क्षण जवळ आला आहे. भारताचे प्रग्यान (रोव्हर)आणि विक्रम (लांडर) हे 23 ऑगस्ट 2023 रोजी सहा वाजता चंद्रावर उतरणार आहेत. भारताच्या चांद्रयान -3 च्या चंद्रावरील ऐतिहासिक लँडिंग कडे साऱ्या जगाचे लक्ष लागलेले आहे. भारताच्या या मोहिमेला यश मिळावे अशी प्रार्थना असंख्य लोक करत आहेत. या मोहिमेद्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अंतराळयानाचे लँडिंग करणारा भारत हा पहिला देश ठरेल.

ISRO चा प्लॅन B 

चांद्रयान-3 मधील सर्व यंत्रणा व्यवस्थित सुरू असल्याबाबत ISRO कडून वेळोवेळी तपासणी केली जात आहे. या यंत्रणा व चंद्रावरील वातावरण या सर्व गोष्टी अपेक्षेपेक्षा काही वेगळे बदल जाणवले तर इस्रो चंद्रयान तीन चे लँडिंग 23 ऑगस्ट ऐवजी 27 ऑगस्टला करण्याचा पर्यायही ठेवला आहे. यान चंद्राच्या पृष्ठभागाच्या अगदी जवळ पोहोचल्यानंतर हा निर्णय घेऊ घेतला जाऊ शकतो.

लँडिंग नंतर काय?

        चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लेंडर उतरल्यानंतर तो जास्त सक्रिय होईल. त्याचे रॅम्प उघडून त्यातून प्रग्यान रोव्हर चंद्रावर उतरेल. काही वेळानंतरच विक्रम लेंडर व प्रग्यान रोव्हर एकमेकांची छायाचित्रे टिपणार आणि ती पृथ्वीवर पाठवणार.

       देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि संशोधक डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या संकल्पनेतून भारत सरकारने अवकाश संशोधनासाठी इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च स्थापना 1962 मध्ये केली. त्यातूनच पुढे 15 ऑगस्ट 1969 रोजी इस्रोची ISRO स्थापना झाली. तेव्हा जे स्वप्न पाहण्यात आले होते ते स्वप्न आज पूर्ण होण्याची वेळ आली आहे.

CHANDRAYAAN MISSION - 3 SOFT LANDING LIVE TELECAST - FROM ISRO OFFICIAL WEBSIT.

https://www.isro.gov.in/

  सॉफ्ट लँडिंग कसे होईल?

 टप्पा पहिला - 

25 × 134 किलोमीटर कक्षेत फिरणारे चंद्रयान जेव्हा 30 किलोमीटर उंचीवर असेल तेव्हा ते जिकडे उतरायचे आहे त्या जागेकडे जाण्यासाठी चंद्राच्या भोवती 713 किलोमीटर अंतर सरकत सरकत जाईल. त्याचा क्षितीज समांतर वेग 1.68 किलोमीटर प्रति सेकंदावरून 0.2 किलोमीटर प्रति सेकंद इतका कमी करण्यात येईल. चंद्रयान वरील 12 पैकी 4 इंजिन वापरून यान 30 किलोमीटर उंचीवरून 7.42 किलोमीटर उंचीवर येईल.


टप्पा दुसरा

          विक्रम लेंडर चंद्राच्या पृष्ठभागाचे छायाचित्रे टिपेल. भागाच्या छायाचित्रांशी तुलना करेल. हा टप्पा 10 सेकंदाचा असेल. एवढ्या वेळात ते आडव्याचे उभे केले जाईल. चंद्राभोवती  3.48 किलोमीटर सरकेल. 7.42 किलोमीटर उंचीवरून ते 6.8 किलोमीटर उंचीवर आणण्यात येईल.इतक्या वेळात त्याचा वेग ही कमी करण्यात येईल.

टप्पा तीन 

            हा टप्पा 175 सेकंदाचा असेल. या काळात हे यान 28.52 किलोमीटर लँडिंग च्या जागेकडे सरकत जाईल. विक्रम लेंडर ची स्थिती यावेळी व्हर्टीकल अशी असेल. त्याची उंची 6.8 किलोमीटर वरून चंद्राच्या पृष्ठभागापासून 800 ते 1000 मीटर उंचीवर आणन्यात येईल. विक्रम लेंडर चे सेंसर सुरू करून पृष्ठभागाचे विश्लेषण करण्यात येईल. जिथे उतरायचे आहे तेथील जमीन तपासन्यात येईल. त्यासाठी विशेष कॅमेरा वापरला जाईल. जागा योग्य नसेल तर त्याच भागात दीडशे मीटर आजूबाजूस जागेचा शोध घेतला जाईल.

टप्पा चौथा

 विक्रम लेंडर चंद्राच्या पृष्ठभागापासून दीडशे मीटर उंचीवर असेल. लेंडर ला सर्व गोष्टी सुरळीत आढळल्या तर विक्रम लंडर पुढच्या 73 सेकंदामध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. भारताने जे अनेक वर्षापासून स्वप्न पाहिलेले होते ते स्वप्न साकार होईल आणि संपूर्ण भारतीयांचा सोनेरी क्षण येईल. संपूर्ण जगात भारताचे स्थान अभिमानाने उंचावेल.

                 भारतीयांसाठी चांद्रयान 3 चे सोफ्ट लँडिंग होण्यापूर्वीचे वीस मिनिटे अत्यंत थरारक  असणार आहेत. या थरारक क्षणाचे साक्षीदार आपण सगळेजण होणार आहोत. वीस मिनिटानंतर काय होईल? चंद्रयान सॉफ्ट लँडिंग करेल की नाही? कशा पद्धतीने करेल ?असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये आहेत. पृथ्वीवरून निश्चित जागेकडे जाताना कक्षा बदलण्याचा संदेश जाईल. खूपच उंच असलेली ही कक्षा झपाट्याने कमी होत जाईल. विक्रम हे यान अवघ्या काही किलोमीटर उंचीवर जाईल. तोपर्यंत उतरण्याच्या ठिकाणाची माहिती यांना कडे आलेली असेल. पण सर्वात मोठा अडथळा असेल तो आडव्या अवस्थेत असलेले विक्रम टू उभे म्हणजे पृष्ठभागावर टेकणारे चार पाय खालच्या बाजूला व इंजिन वरच्या बाजूला असे अचूक स्थिती बदलण्याच्या. जर आडव्या अवस्थेतील विक्रम2 उभे झाले नाही तर त्याच क्षणी इस्रोला दुसरा दिवस व दुसरे ठिकाण शोधावे लागेल. हा खूप मोठा अडथळा आहे. अपेक्षेप्रमाणे विक्रम 2 पाय खाली करून उतरणार असल्याचा संदेश मिळाला तर अर्धी मोहीम फत्ते झाली म्हणायची. त्यानंतर विक्रमला अत्यंत संथ वेगाने खाली उतरावे लागेल. वेग शेवटच्या पाच मिनिटात कमी करत करत विक्रम 2 ने थोडीशी धूळ उडवीत चंद्रप्रष्ठाला स्पर्श केला व चारही पायावर हे यान स्थिर झाले तर ही मोहीम खूप चांगल्या प्रकारे यशस्वी होईल.  सगळीकडे टाळ्यांचा कडकडाट होऊन आपला देश आनंदात जाईल सर्व शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांना यश येईल.

जगात भारतीयांची मान अभिमानाने उंचावेल.

शैक्षणिक बातम्या तसेच उपयुक्त माहिती सर्वात आधी वाचण्यासाठी आमचा facebook group जॉईन करा.

EDUCATION & INFORMATION