मेरी मिट्टी, मेरा देश

 


सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून मग लिंक क्लिक करा.

• सर्वप्रथम तुम्हाला मेरी माती मेरा देश अधिकृत वेबसाइटला भेट द्या.


https://merimaatimeradesh.gov.in/


• आता होम पेजवर तुम्हाला “टेक प्लेज” चा पर्याय दिसेल. ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल.

• तुम्ही क्लिक करताच, एक नवीन पेज उघडेल, ज्यामध्ये तुम्हाला पुन्हा “टेक प्लेज” या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

• आता उघडणाऱ्या नवीन पेजमध्ये तुम्हाला तुमचे नाव, मोबाईल नंबर, राज्य आणि जिल्हा टाकावा लागेल.

• आता तुम्हाला खाली दिलेली शपथ काळजीपूर्वक वाचावी लागेल आणि सबमिटच्या पर्यायावर क्लिक करा.

• आता नव्याने उघडलेल्या पेजवर, तुम्हाला रोप लावताना, हातात माती घेतलेला किंवा हातात मातीचा दिवा धरताना सेल्फी अपलोड करावा लागेल.

• अपलोड केल्यानंतर, तुम्हाला सबमिटच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. तुम्ही क्लिक करताच मेरी माती मेरा देश प्रमाणपत्र तुमच्या स्क्रीनवर दिसेल. जे तुम्ही डाउनलोड देखील करू शकता.

पंचप्रण शपथ

आम्ही शपथ घेतो की,

  • भारतास २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करू.
  • गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करू..
  • देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करू.
  • भारताची एकात्मता बलशाली करू आणि देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रति सन्मान बाळगू.
  • देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करू.