इयत्ता सहावी विज्ञान विषयातील सर्व घटकावर आधारित अत्यंत महत्त्वाचे मुद्दे - भाग 2

 


          इयत्ता सहावी विज्ञान विषयातील सर्व घटकावर आधारित परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. यामध्ये या इयत्तेतील महत्त्वाच्या संकल्पनांचा समावेश केलेला आहे. अध्ययन निष्पत्ती डोळ्यासमोर ठेवून त्या साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील या गोष्टींचा सर्वांगाने विचार करून खालील महत्त्वाचे मुद्दे देण्यात आलेले आहेत.कोणत्याही परीक्षेला जाता जाता अगदी कमी वेळामध्ये संपूर्ण इयत्तेची उजळणी होण्याच्या दृष्टीने सर्व मुद्दे देण्यात आलेले आहेत. या मुद्द्यांचा वाचन करून गेल्यास परीक्षेला निश्चितच फायदा होईल परीक्षेला जाता जाता वाचूया अत्यंत महत्त्वाचे मुद्दे.

  •  पृथ्वी जे बोल लावून वस्तूंना आपल्याकडे खेचते त्यास गुरुत्वीय बल असे म्हणतात.
  • गुरुत्वाकर्षणाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी लावला.
  • चुंबकामुळे लावल्या गेलेल्या बलाला चुंबकीय बल असे म्हणतात.
  • SI पद्धतीत कार्य आणि ऊर्जा यांचे एकक ज्यूल आहे.
  •  ज्या वस्तूमुळे ध्वनी निर्माण होतो तिला ध्वनी स्त्रोत म्हणतात. ध्वनीची तीव्रता डेसिबल dB मध्ये मोजतात.
  • रॉबिन व वूडकॉक हे पक्षी जमिनीमध्ये असणाऱ्या गांडूळाचा आवाज ओळखतात.
  • ज्या पदार्थातून प्रकाश आरपार जातो तो पारदर्शक पदार्थ असतो.
  • थोर भारतीय शास्त्रज्ञ सर सी. व्ही. रामन यांनी सादर केलेल्या प्रकाशाच्या विकिरणासंबंधीचे संशोधन रामन परिणाम या नावाने ओळखले जाते. त्यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी हा शोध लावला. या शोधाच्या स्मरणार्थ 1987 पासून 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो.
  • चुंबकाला चिकटणाऱ्या पदार्थांना चुंबकीय पदार्थ म्हणतात. लोह, कोबाल्ट, निकेल हे धातू चुंबकीय पदार्थ आहेत.
  • चुंबकीय बल चुंबकाच्या दोन्ही टोकांकडे म्हणजेच ध्रुवाकडे एकवटलेले असते.
  • चुंबकाच्या साह्याने वीज निर्मिती करण्याचे तंत्र मायकेल फॅरेडे या ब्रिटिश शास्त्रज्ञांनी विकसित केले.
  • सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे 6000 अंश सेल्सिअस इतके आहे.
  • सूर्याला सर्वात जवळचा ग्रह बुध हा आहे.
  • सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह म्हणजे गुरु. गुरु ग्रहावर सतत प्रचंड वादळे होत असल्याने या ग्रहास वादळी ग्रह असेही म्हणतात.
  • मंगळ या ग्रहास लाल ग्रह असेही म्हणतात मंगळ ग्रहावर सूर्यमालेतील सर्वात उंच व सर्वात लांब पर्वत ऑलिंपस मॉन्स हा आहे.
  • भोवती कडा असणारा ग्रह म्हणजे शनी. शनी ग्रहाची घनता खूप कमी आहे. शनी हा ग्रह एखाद्या मोठ्या समुद्रामध्ये तरंगू शकतो.
  • नेपच्यून ग्रहावर एक ऋतू सुमारे 41 वर्षाचा असतो.
  •  राकेश शर्मा हे 1984 साली अवकाशात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर होते. संपूर्ण भारतीयांसाठी त्यांनी अवकाशातून सारे जहाँ से अच्छा, हिंदोस्ता हमारा! हा संदेश पाठवला.
  • एका वर्षात सुमारे 365 दिवस आणि 6 तास असतात.
  • 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान रात्र असते.
  • 22 डिसेंबर हा वर्षातील सर्वात लहान दिवस व सर्वात मोठी रात्र असते.
  • 22 मार्च व 23 सप्टेंबर बारा तास दिवस आणि बारा तास रात्र असते.
  •  ओझोन वायूचा थर तपांबर आणि स्थितांबर यांच्या दरम्यान असतो.
  •  आपल्या देशात धान्य उत्पादनात झालेली प्रचंड वाढ हरितक्रांती या नावाने ओळखली जाते हरित क्रांतीचे जनक कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर एम एस स्वामीनाथन हे आहेत.
  •  भारतात 2013 मध्ये अन्नसुरक्षा कायदा करण्यात आला.