शिक्षण विस्तार अधिकारी जाहिरात 2023 सविस्तर माहिती




♦️शिक्षण विस्तार अधिकारी 2023♦️

    महाराष्ट्रातील विविध जिल्हा परिषदेतील एकूण 81 शिक्षण विस्तार अधिकारी पदांची जाहिरात प्रसिद्ध ; जाणून घ्या नवीन अभ्यासक्रम, रिक्त पदे, वेळापत्रक व परीक्षा पद्धती व महत्वपूर्ण संदर्भ

           महाराष्ट्रातील विविध जिल्हा परिषदेतील  शिक्षण विस्तार अधिकारी पदांची एकूण 81 पदांची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. या पदासाठी  200 गुणांसाठी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा आय.बी.पी.एस कंपनीकडून घेण्यात येणार आहे. या पदांसाठीचा नवीन अभ्यासक्रम, रिक्त पदे, परीक्षा पद्धती, वेतनश्रेणी व महत्वपूर्ण संदर्भ पुस्तके यांची माहिती सविस्तर या लेखात दिलेली आहे.  शिक्षकांना परीक्षेद्वारे गुणवत्तेनुसार शिक्षण विस्तार अधिकारी होण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. जिल्हा परिषदेतील रिक्त पदांची माहिती संबंधित जिल्ह्याच्या वेबसाईटवर असून जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच शिक्षकांनी शिक्षण विस्तार अधिकारी पदासाठी अर्ज करावा.

♦️👉जिल्हा परिषद शिक्षण विस्तार अधिकारी  2023 एकूण 81 रिक्त पदे जाहिराती

1.यवतमाळ 18 पदे

2.पालघर 10 पदे

3.चंद्रपूर 9 पदे

4.अमरावती 7 पदे

5.नाशिक 7 पदे

6.नंदुरबार 4 पदे

7 .सोलापूर 7 पदे

8.नागपूर 9 पदे

9.बुलढाणा 1 पदे

10.अकोला 1 पदे

11. जालना 1 पदे

12. ठाणे 1पदे

13. सातारा 2 पदे

14. नांदेड 1

15. गडचिरोली 1

16. पुणे 2

(ज्या  जिल्हा परिषद जाहिराती पाहिलेल्या आहेत,  तेथील शिक्षण विस्तार अधिकारी पदे जाहिरातीत दर्शवली आहेत.)

जाहिरात सविस्तर वाचण्यासाठी खाली पहा.

सर्व जिल्हा परिषद जाहिरात


            

♦️👉ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक*

1.ऑनलाइन अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक - 25 ऑगस्ट 2023

2.ऑनलाइन अर्ज नोंदणीची अंतिम दिनांक - 25 ऑगस्ट 2023

3.ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत -25 ऑगस्ट 2023

4.परीक्षेसाठी ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक - परीक्षेच्या आधी 7 दिवस


विस्तार अधिकारी (शिक्षण - वर्ग 3 श्रेणी 2) पदासाठी शैक्षणिक अर्हता व अनुभव

          ● कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.ए./बी.कॉम./ बी.एस.सी. ही पदवी किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण केली असेल आणि 

      ● ज्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.एड. अथवा समकक्ष पदवी किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण केली असेल आणि

      ● ज्यांना मान्यताप्राप्त प्राथमिक / माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय, अध्यापक विद्यालयातील शासनमान्य पदावरील सक्षम प्राधिकाऱ्याने वैयक्तीक मान्यता दिलेला किमान तीन वर्षाचा अध्यापनाचा किंवा प्रशासनाचा अनुभव आहे, असे उमेदवार या पदासाठी पात्र राहतील.

वेतनश्रेणी - ₹ 41800 - 132300

शिक्षण विस्तार अधिकारी 2023 पदाचा नवीन अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती व संदर्भ पुस्तके

        शिक्षण विस्तार अधिकारी पदासाठी शिक्षणशास्त्रविषयक तांत्रिक अभ्यासक्रम 80 गुण, मराठी 30 गुण, इंग्रजी 30 गुण, सामान्य ज्ञान 30 गुण व बुद्धिमापन व गणित 30 गुण असे विभाजन आहे. 

  परीक्षेत प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असून 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारले जाणार आहेत. ऑनलाइन परीक्षेसाठी दोन तास वेळ असणार आहे.


विस्तार अधिकारी (शिक्षण) तांत्रिक अभ्यासक्रम (40 प्रश्न 80 गुण)

शिक्षण विस्तार अधिकारी परीक्षेसाठी शिक्षणशास्त्र हा घटक 80 गुणांना असून या घटकाच्या अभ्यासावरच परीक्षेतील  यश अवलंबून आहे. शिक्षण विस्तार अधिकारी  नवीन अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहे.

     1.बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ व सदर अधिनियमा नुसार महाराष्ट्र राज्य नियमावली २०११ (अदयावत दुरुस्त्यांसह) विश्लेषण, बलस्थाने व अडचणी

2.शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था / संघटन व त्यांचे कार्य

3.UNICEF, NCERT, NUEPA, NCTE CCRT, TISS, TIFR, Homi Bhabha center of Science Education, RTE, EFLU, MPSP, SCERT, MIEPA, DIET 

4.प्रश्न निर्मिती ( स्वाध्याय) कौशल्य ASER, NAS, PISAT

5.प्रगत अध्ययन अध्यापन शास्त्र

6.नविन शैक्षणिक धोरण- २०२०

7.संप्रेषण कौशल्य समाज संपर्काची विविध साधने 

8.समग्र शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान

9.प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियान 

10.राष्ट्रीय शिक्षा अभियान

11.केंद्र व राज्य शासनाच्या अर्थ सहाय्य विदयार्थी वैयक्तिक लाभाच्या योजना

12.संगणक व माहिती तंत्रज्ञान- शैक्षणिक क्षेत्रातील संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवर्किंग आणि टेक्नॉलॉजी, शासनाचे कार्यक्रम मिडीया लॅब, एशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामूहिक माहिती केंद्र, ई-गव्हर्नर, शालेय सरल प्रणाली U-DES, DBT अल क्लासरुम, डिजीटल स्कूल, दैनंदिन माहिती देवाण घेवाण तंत्र, ई-मेल, व्हॉटस अॅप

13.महाराष्ट्र जिल्हा परिषदा, पंचायत समिती अधिनियम १९६१

14.महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९६६ व पंचायतराज व्यवस्थापन, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदा (उक्त पुस्तकांच्या अनुषंगाने शिक्षण संबंधी तरतुदी)

15.शालेय शिक्षण विभागाची संरचना (प्रशासकीय विभाग व विविध संचालनालय) व त्यांची कार्यपध्दती

संपूर्ण अभ्यासक्रम संदर्भ पुस्तके*

1.केंद्रप्रमुख पेपर दुसरा व शिक्षण विस्तार अधिकारी शिक्षणशास्त्र तांत्रिक ज्ञान - डॉ.शशिकांत अन्नदाते (तिसरी आवृत्ती)*

       सदर पुस्तकात शिक्षणशास्त्र तांत्रिक अभ्यासक्रम मुद्दे व शिक्षणशास्त्र संकल्पनाची माहिती मुद्देसूद व परीक्षाभिमुख पद्धतीने दिली असल्याने हे पुस्तक अभ्यासणे अत्यावश्यक आहे.

2. शिक्षण विस्तार अधिकारी संपूर्ण मार्गदर्शक - डॉ.एस.कमल व स्वाती शेटे (के'सागर पब्लिकेशन्स)- संपूर्ण अभ्यासक्रम तयारीसाठी व भरपूर वस्तुनिष्ठ प्रश्न सरावासाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ

3. शालेय प्रशासन व संघटन - डॉ.अरविंद दुनाखे

4.संपूर्ण शिक्षक अभियोग्यता, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र - डॉ.शशिकांत अन्नदाते (नववी आवृत्ती)

5.महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग शासननिर्णय व योजना

6. केंद्र शासनाच्या शिक्षण विषयक योजना

7.शिक्षक अभियोग्यता विशेष तयारी - स्वाती शेटे (तिसरी आवृत्ती)

8.अभ्यासक्रमातील शिक्षण विषयक संस्थांची संकेतस्थळ


*मराठी (बारावी)* (15 प्रश्न 30 गुण)

सर्वसाधारण शब्दसंग्रह

वाक्यरचना

व्याकरण

म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग

उताऱ्यावरील प्रश्न

संदर्भ पुस्तक

के सागर/ बाळासाहेब शिंदे/ डॉ.आशालता गुट्टे


बौद्धिक चाचणी (पदवी) (15 प्रश्न 30 गुण)

सामान्य बुद्धीमापन व आकलन

तर्क आधारित प्रश्न

अंकगणित आधारित प्रश्न

*संदर्भ पुस्तक*

अनिल अंकलगी/के सागर/पंढरीनाथ राणे


इंग्रजी (बारावी)

General Vocabulary

Sentence Structure

 Grammar

Idioms & Phrases- their meaning and use

Comprehension

संदर्भ पुस्तक

के सागर/ बाळासाहेब शिंदे


*सामान्य ज्ञान (पदवी)* (15 प्रश्न 30 गुण)*

भारताचा इतिहास, भारतीय राष्ट्रीय चळवळ, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घटनांसह महाराष्ट्र भारत जागतीक भूगोल - भौतिक, सामाजिक,

आर्थिक भूगोल भारत आणि महाराष्ट्र राज्य आणि शासन, - राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायती राज,

सार्वजनिक धोरण, हक्कांचे मुद्दे आर्थिक आणि सामाजिक विकास शाश्वत विकास ध्येये,

गरिबी समावेशन, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम

सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान

पर्यावरणीय परिस्थीतीतील जैवविविधता हवामान बदल,सामाजिक समस्या, मानव विकास व पर्यावरण

 भारतीय अर्थव्यवस्था, विकास विषयक अर्थशास्त्र, वृद्धी आणि विकास

चालू घडामोडी - आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, महाराष्ट्रासह कृषि आणि ग्रामीण विकास

     संबंधित जिल्ह्याचा भूगोल, सामाजिक हवामान इत्यादी स्थानिक बाबी / वैशिष्ट्ये

संदर्भ पुस्तक

1.लेटेस्ट जनरल नॉलेज - विनायक घायाळ

2.जनरल नॉलेज - के सागर