जीवाणू - विषाणूजन्य रोग , लक्षणे व लसीकरण सविस्तर माहिती


    

  रोग, लक्षणे व लसीकरण 

     आरोग्य

            शारीरिक, मानसिक व सामाजिक रित्या पूर्णतः चांगले असण्याची स्थिती म्हणजे आरोग्य होय.

       शरीर क्रियात्मक किंवा मानसशास्त्रीय रित्या शरीरातील महत्त्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी स्थिती म्हणजे रोग होय.

  A} संक्रामक रोग - जे रोग रोगजंतू मुळे होतात त्यांना संक्रामक रोग म्हणतात. यांच्या संक्रमणावर अवलंबून याचे तीन प्रकार पडतात.

१] साथीचे रोग

      हवामानातील विशिष्ट बदलामुळे, दूषित पाण्यामुळे एकाच वेळी अनेकांना एकच रोग होतो त्यास साथीचे रोग म्हणतात.

 उदा. कॉलरा, विषमज्वर, हगवण, डोळे येणे इत्यादी.

२] संसर्गजन्य रोग 

      सततच्या सहवासाने रोग्याच्या शरीरातील रोगजंतूंचा हवेमार्फत निरोगी व्यक्तीमध्ये प्रादुर्भाव होतो. अशा रोगांना संसर्गजन्य रोग म्हणतात. उदा. क्षयरोग

३] संपर्कजन्य रोग 

      रोग्याच्या शरीरातील जंतूचा सततच्या संपर्कामुळे किंवा स्पर्शावाटे नजीकच्या सहवासातील निरोगी व्यक्तीमध्ये प्रादुर्भाव होऊन त्यांना रोग होतो.

 अशा रोगाला संपर्कजन्य रोग म्हणतात.

 उदा. खरूज,इसब,गजकर्ण, नायटा, कुष्ठरोग इत्यादी.

   B} असंक्रामक रोग 

ज्या रोगात कुठल्याही रोगजंतूचा समावेश होत नसून ते शरीरातील अंतर्गत असंक्रम कारणामुळे होतात अशा रोगांना असंक्रामक रोग म्हणतात.

 हे रोग पसरत नाहीत.

उदा. आनुवंशिक रोग, संधिवात, रातांधळेपणा, कर्करोग, मधुमेह.

रोग होण्यास कारणीभूत घटक

  • स्वतःचा निष्काळजीपणा, तसेच अस्वच्छता हा रोग होण्यामधील सर्वात महत्त्वाचा घटक आहे.
  • त्यानंतर कुटुंबाचा निष्काळजीपणा व सार्वजनिक सोयीसुविधा व्यवस्थित नसणे.

7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन आहे.

पोलिओचे विषाणू फक्त मानवामध्येच आढळतात

जिवाणू

  •  साधारणता एक पेशीय असतात.
  •  विषाणू पेक्षा आकाराने मोठे असतात.
  •  जिवाणू मध्ये केंद्रक नसते.
  •  जिवाणूंना चांगली अशी पेशीरचना असते. 
  • जिवाणू हे फायदेशीर असतात पण बहुतांश जिवाणू घातक असतात.

फायदेशीर जीवाणू

  • शिम्बाधारी वनस्पतीच्या मुळात असणारे रायझोबियम हे जिवाणू हवेतील नायट्रोजन वनस्पती साठी उपयोगात आणतात.
  • मातीतील  अझाटोबक्तर जिवाणू हवेतील नायट्रोजनचे स्वतंत्रपणे स्थिरीकरण घडून आणतात.
  • लॅक्टोबॅसिलस हा दह्यामधील जिवाणू शरीरात हानी पोहोचवत नाही.

घातक जिवाणू - 

  • स्टेफीलोकॉकस जिवाणू खाद्यपदार्थावर वाढताना अँन्तोरोटोक्झीन नावाचे विषारी रसायन तयार करते. त्यामुळे असे पदार्थ खाताच जुलाब उलट्या होतात.
  • हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थाची वापराची मुदत संपली की त्यात क्लोस्ट्रीडीअम जिवाणू वाढण्याची शक्यता असते.

जीवाणूजन्य रोग -

विषमज्वर

  • हा रोग साल मोनेला टायपिंग या जिवाणूमुळे होतो.
  • दूषित अन्न पाणी तसेच घरमाशीद्वारे याचा प्रसार होतो.
  • या आजारामध्ये आतड्याचा प्रादुर्भाव होतो.
  • भूक मंदावणे, ताप वाढणे, पोटावर छातीवर पुरळ येणे, अतिसार, मळमळ, डोकेदुखी ही या रोगाची लक्षणे आहेत.
  • निदानासाठी विडाल टेस्ट चा वापर करतात
  • लस - TAB लस  0.5 ml त्वचेच्या खाली
  • नवीन लस Tyzla आणि Typhin Vi

क्षयरोग

  • क्षयरोग मायकोबॅक्टेरिया जिवाणू पासून होतो.
  • थुंकीद्वारे, हवे द्वारे या रोगाचा प्रसार होतो.
  • हा रोग बहुतांश अवयवाला होतो.
  •  जसे मूत्रपिंड, हाडे, मज्जारजू व मेंदू या अवयवाला होतो. परंतु बहुत करून फुफ्फुसावर हल्ला होतो.
  • 21 दिवसापेक्षा जास्त खोकला, ताप, छातीत दुखणे, थुंकीतून रक्त पडणे, वजन कमी होणे ही या रोगाची लक्षणे आहेत.
  • या रोगाच्या निदानासाठी एक्स-रे किंवा Turerculin Test केली जाते.
  • या रोगावर Streptomycin हे औषध दिले जाते.
  •  तसेच या रोगावर BCG ही लस दिली जाते.
  •  हा डोस जन्मल्यानंतर लगेचच डाव्या दंडाला त्वचेच्या खाली देतात.
  • क्षयाचा जिवाणू रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञाने 1882 मध्ये शोधून काढला.
  • DOTS - Directly Observed Treatment Short Course ही क्षय रोगावर उपचार पद्धती आहे.

कॉलरा / पटकी

  • Vibrio Cholerae या जीवाणूपासून होतो.
  • या रोगाचा प्रसार दूषित अन्न आणि पाणी यातून होतो.
  • हा आजार मुख्यतः मोठ्या आतड्यांना होतो.
  • उलट्या, तीव्र जुलाब, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे, त्वचा सुकणे, डोळे खोल जाणे पायात गोळे येणे, पोटात दुखणे या आजाराची लक्षणे आहेत.
  • या आजारावर हपकिनची लस दिली जाते.

डांग्या खोकला

  • Haemophilus Pertusis या जिवाणूपासून हा आजार होतो.
  •  याचा प्रसार हावे मार्फत होतो.
  •  हा मुख्यता श्वसन संस्थेला होतो.
  •  तीव्र खोकला व छातीत दुखणे ही याची लक्षणे आहेत.
  •  या आजारावर DPT त्रिगुणी लस दिली जाते.

धनुर्वात

  •  हा आजार ओल्या जखमेतून पसरतो.
  •  हा आजार मुख्यतः मध्यवर्ती चेतासंस्थेला होतो.
  •  दातखिळ बसणे, ताप, तीव्र वेदना ही याची लक्षणे आहेत,
  • DPT त्रिगुणी लस दिली जाते.

कुष्ठरोग 

  • जीवाणूचे नाव Mycobacterium Leprae.
  •  संपर्क रक्त द्रवबिंदू याद्वारे या आजाराचा प्रसार होतो.
  •  परिघिय चेतासंस्थाला हा आजार होतो.
  •  बोट झडणे, सुरकुत्या पडणे, त्वचेवर चट्टे, त्वचा कोरडे पडणे ही आजाराची लक्षणे आहेत.
  •  या आजारावर लस उपलब्ध नाही.

जिवाणूपासून होणारे रोग आठवणी ठेवण्यासाठी खालील एक वाक्य पाठ करावे लागेल.

काकू धनु डावी आहे म्हणून घशाला पकड.

कॉलरा, कुष्ठरोग, नुर्वात, निमोनिया, डांग्या खोकला, विषमज्वर,टसर्प, क्षय, प्लेग.


अन्न व अन्नसुरक्षा, पोषक द्रव्ये - पोषण आणि आहार - जीवनसत्वे या घटकाविषयी सविस्तर वाचण्यासाठी खाली पहा.

अन्न व अन्नसुरक्षा, जीवनसत्वे


विषाणू पासून होणारे रोग

  • विषाणूंना ठराविक पेशीरचना नसते.
  • विषाणूंच्या भोवती प्रथिनांचे आवरण असते.
  • विषाणू म्हणजे विष तयार करणारे.
  • सर्वच विषाणू हे घातक असतात.
  • विषाणू हे स्वतःचे अन्न स्वतः तयार करत नाहीत तर ते रोग्याच्या शरीरात जाऊन त्याची सिस्टीम वापरून तयार करतात.

कांजण्या

  • एकमेकांच्या संपर्कात आल्याने किंवा द्रव बिंदू द्वारे या रोगाचा प्रसार होतो.
  •  हा मुख्यता त्वचेचा आजार आहे.
  • खूप ताप येणे, डोके दुखणे, त्वचेवर पाण्यासारखे फोड येणे ही आजाराची लक्षणे आहेत.
  • लस - Anti - Varicella Vaccine 
  • हा रोग होऊन गेला की परत होत नाही म्हणजेच प्रतिकारक शक्ती जन्मभर टिकते.

देवी

  •  रोग द्रवबिंदू द्वारे याचा प्रसार होतो. 
  • मुख्यतः त्वचा या अवयवाला हा रोग होतो.
  •  ताप, अंगावर पुरळ येणे, आंधळेपणा ही या रोगाची लक्षणे आहेत.
  •  देवीची लस दिली जाते.
  •  देवीची लस एडवर्ड जेन्नर यांनी शोधून काढले.
  • देवी हा रोग भारतातून संपूर्णपणे गेलेला आहे.

गोवर 

  • द्रवबिंदू द्वारे हवे मार्फत तसेच संपर्क द्वारे पण होतो.
  • हा त्वचेचा आजार आहे.
  •  ताप. लाल रंगाचे त्वचेवर पुरळ येणे ही या रोगाची लक्षणे आहेत.
  • MMR त्रिगुणी लस त्यावर दिली जाते.

पोलिओ 

  • Entero Viruses या विषाणूमुळे होतो.
  • दूषित अन्न व पाणी यातून या रोगाचा प्रसार होतो.
  •  मध्यवर्ती चेतासंस्थेला हा आजार होतो.
  •  ताप घसा लाल होणे हात पाय डोळे पडणे अशक्तपणा ही आजाराची लक्षणे आहेत.
  •  लस - यासाठी साल्क आणि सेबीन ची लस दिली जाते.
  • सध्या भारतात सेबीन लस तोंडाद्वारे घेण्याची लस देतात.
  • साल्क लस इंजेक्शन नी देतात.

  1. भारत सरकारने 1994 पासून पोलिओचे निर्मूलन करण्यासाठी पोलिओ लसीकरण सुरू केले.
  2. पोलिओ हा रोग भारतातून 2014 सालापासून निघून गेला आहे.
  3. पल्स पोलिओ मोहीम सर्वप्रथम नऊ डिसेंबर 1995 रोजी चालू झाली.

AIDS

ACQUIRED IMMUNO DEFICIENCY SYNDROME

  • HIV या विषाणूमुळे होतो.
  • Human Immuno Deficiency Virus
  • संक्रमित व्यक्तीसोबत असुरक्षित लैंगिक संबंध, रक्ताशी थेट संबंध, संक्रमित आईकडून बाळाला या रोगाचा प्रसार होतो.
  • या आजारावर लस उपलब्ध नाही.
  • निदानासाठी ELISA ही चाचणी करतात.
  • भारतामध्ये 1986 साली मद्रास मध्ये पहिला HIV रुग्ण आढळला.
  • जगात सर्वात जास्त HIV रुग्ण भारतात आहेत.
  • भारतात सर्वात जास्त HIV रुग्ण महाराष्ट्रात आहेत.
  • 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिवस म्हणून साजरा केला जातो.
  • एड्स साठी टोल फ्री नंबर 1097.


गालफुगी, रूबेला हे सुद्धा विषाणूजन्य रोग आहेत.

सूक्ष्मजीव या घटकाविषयी सविस्तर अभ्यासण्यासाठी खाली पहा.

सुक्ष्मजीव