मुंबई - हजारो माणसांच्या गर्दीतील एकटेपणा.


मुंबई - हजारो माणसांच्या गर्दीतील एकटेपणा.

       तसा मुंबई ला जाण्याचा आयुष्यात सर्वात प्रथम योग आला तो माझ्या वयाच्या 24 व्यां वर्षी म्हणजे 2013 मध्ये. मुंबई बद्दल खूप काही ऐकलं होत, टीव्ही मध्ये बघितलं होत.पण प्रत्यक्ष अनुभवण्याचा प्रथमच योग आला होता. आता परत 10 वर्षा नंतर मुंबाई बघण्याचा योग आला.रेल्वेत बसून विलवडे - लांजा ते मुंबई असा प्रवास होता. रात्री प्रवास चालू झाला. मात्र अंधार असल्याने कोकणचे सौंदर्य यावेळी अनुभवण्याचा योग आला नाही. मात्र बोगदे आले की लगेच समजायचे. महाराष्ट्रात सर्वात जास्त बोगदे याच मार्गावर आहेत. रात्रभर बोगद्याच्या आवाजाने झोप लागते कसली!!

      पहाटे पासूनच बाहेर बघत होतो.  पनवेल पासून लहान मोठी घरेच घरे दिसत होती. मात्र ठाणे वरून पुढे जात असताना मोठ मोठे घरे, उंचच उंच इमारतीचे दर्शन  व्हायला सुरुवात झाली. जसे जसे CST कडे जाईल तसे अनेक मजली टोलेजंग इमारती दिसू लागल्या.त्यावरून एखादा इतका श्रीमंत असू शकतो का याच्या विचारानं मनात काहूर माजले.खिडकीतून बाहेर बघण्यात मग्न असतानाच समोरून ट्रेन आलेली दिसायची.काळजाचा ठोकाच चुकायचा.वाटायचं की ट्रेन आता आपल्या ट्रेनला धडकते की काय, मात्र क्षणात ती ट्रॅक बदलून शेजारच्या ट्रॅक वरून जायची. जीवात जीव आल्या सारखे वाटू लागले.दोन ट्रेन एकदम शेजारून शेजारून जाताना मुंबई मध्ये पाहण्याचा अनेक वेळा यानंतर योग आला. जणू ती सवयच होऊन गेली.CST ला उतरल्यानंतर समजले की इतकं मोठ देखील स्टेशन असू शकते,जवळपास २० च्यापुढे प्लॅटफॉर्म असतील की काय. मानस तर इतकी दिसली की गावी मी मुंग्या कमी बघितल्या असतील. प्रत्येक जण पायाला भोवरा बसवल्या सारखं, धावत होता की चालत होता यातील फरक ओळखणे जणू अशक्यच!

        जीवाची मुंबई म्हणतात ते बहुतेक हेच असेल. कोणालाच कोणाशी बोलायला वेळ नाही. भीड होते हुये भी मै अकेला याची जाणीव होऊ लागली. त्यानंतर लोकल मध्ये चढण्याचा व प्रवास करण्याचा तर अनुभव वेगळाच.लोकल साठी प्लॅटफॉर्म वर उभे राहिल्या नंतर मी माणसाच्या गर्दीत मागून पुढे प्लॅटफॉर्म शोधायला येत होतो. म्हणजे प्लॅटफॉर्म सुद्धा दिसत नव्हता.  तसाच गर्दीत घुसून थांबलो. थोड्या वेळानंतर अजून गर्दी वाढली. माझ्या मागून पुढून लोकच लोक. या गर्दीत स्त्री आणि पुरुष असा भेदच उरला नाही. स्त्री पुरुष समानता असावी असं ऐकलं होत. मात्र खरी स्त्री पुरुष समानता इथे पहायला मिळाली. सगळे गर्दीत एकमेकांना ढकलत होते. इतक्यात लोकल आली. मला वाटले आता आपल्याला लोकल मध्ये चढता येईल का? या विचाराने थोडासा घाबरलो. वाटल ही जाऊ दे. आपण नंतर च्या  लोकल ने जाऊ.मात्र गर्दीतून बाहेर पडणे देखील अशक्य झाले. आता काय करू. थोडा वेळ तसाच डोळे बंद करून थांबलो. गर्दी जिकडे ढकलेल तिकडे जाऊ लागलो. थोड्या वेळानंतर डोळे उघडुन बघतोय तर आश्चर्यच, मी चक्क लोकल डब्यात. बसायचा विचार तर सोडाच पण माझे दोन पावले खाली ठेकवेन म्हणतो तर त्यासाठी पण जागा अपुरी. गर्दीत कसले स्त्री आणि कसले पुरुष. सगळे एकमेकांना ढकलत आत पण तसेच.क्षणात वाटलं पंतप्रधान यांना पण इतकी सेक्युरिटी नसेल जितकी आता माझ्या भोवती आहे. Z+ पेक्षा सुद्धा कडकं सेक्युरीटी मध्ये मी होतो. पण पण खंत वाटली. इतकी माणसांच्या गर्दीत सुद्धा मी एकटा होतो. कोणाचं बोलत नव्हते. मात्र सगळे कामात होते. प्रत्येक जन मोबाईल वर काहीतरी करण्यात गुंतला होता. इथे माणसांच्या भावनेची किंमत शून्य असल्याची जाणीव झाली. सगळ्यांच्या हातात मोबाईल व कानात इअरफोन.माणसांनी हातात मोबाईल पकडला आहे का मोबाईल ने माणसाचे मन पकडून ठेवले आहे यातील भेद समजून येत नवता. क्षण भर माझं गाव आठवलं.गावात नुसत एक फेरी जरी मारून आलो तर शंभर लोकांना बोललेली असतो. नवीन एखाद्या गावात गेलो तर तिथे खूप जण बोलायला असतात. मात्र ग्रामीण भागातील गाव व मुंबई अशी तुलना करत असतानाच लोकल थांबली. मला दरवाजा जवळ जागा मिळाली असल्याने मला त्या स्टॉप ला उतरायचे नसतांना सुधा मी कधी डब्याच्या बाहेर आलो हे कळायच्या आत लोकल पण निघून गेली. मी बाकड्यावर बसून गर्दीकडे बघत मनात आले, कृत्रिम दूनियेपेक्षा आपला गावच बरा.

क्रमशः ..............माझे अनुभव.

मुंबई बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी.