विज्ञान विषयातील महत्वाच्या घटकावर सराव चाचणी क्र. 5



 विज्ञान विषयातील महत्वाच्या घटकावर सराव चाचणी क्र. 5

विज्ञान विषयातील महत्त्वाच्या घटकावर आधारित चाचणी तयार करण्यात आलेली आहे.

  1.  या चाचणीमध्ये एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले आहेत.
  2.  प्रत्येक प्रश्नासाठी दोन गुण देण्यात  आलेले आहेत. 
  3. आपण 30 मिनिटांचा वेळ लावून चाचणी सोडवा. . 
  4. मिळालेले गुण चाचणी क्र टाकून वहीत लिहून ठेवा..
  5.  विद्यार्थ्यांनी हे सर्व प्रश्न वहीत लिहून घेतले तर त्यांना या मुद्यांचा अधिक सराव होईल.
  6. अभ्यास करत असताना आपल्या सरावाला खूप महत्त्व आहे.
  7.  प्रॅक्टिस मेक्स मन परफेक्ट या उक्ती प्रमानेच  सरावानेच आपण परफेक्ट होत असतो.
  8. सर्वांनी चाचणी सोडवा,सर्वांना चाचणी सोडवण्यासाठी  शुभेच्छा.





  विज्ञान विषयातील महत्वाचे मुद्दे घटक निहाय सविस्तर वाचण्यासाठी खाली पहा.


           स्नायूंच्या अभ्यास शास्त्राला Myology म्हणतात. स्नायूंचा मूलभूत गुणधर्म अंकुचन पावणे आहे. शरीरातील सर्वात मोठा स्नायू मांडीमध्ये असतो. तर सर्वात लहान स्नायू कानातील स्टेप्स या हाडाला जोडलेला असतो. शरीरातील स्नायू बळकट व कार्यप्रवण असणे अत्यंत आवश्यक आहे. मानवी शरीरात 600 पेक्षा अधिक स्नायू असतात. प्रौढ निरोगी व्यक्तीच्या शरीराच्या सुमारे 40 टक्के वजन स्नायूंची असते. मानवी चेहऱ्यामध्ये जवळपास 30 स्नायू असतात. आनंद, दुःख, भीती असे अनेक भाव त्या स्नायूंच्या हालचालीमुळे दिसतात.
         साबणाचे कठीण साबण व मृदू साबण असे प्रकार आहेत. कठीण साबण कपडे धुण्यासाठी वापरतात. हा तेलाम्लाचा सोडियम क्षार असतो. तर मृदू साबण स्नानासाठी वापरतात. हा तेलाम्लाचा पोटॅशियम क्षार असतो. यामुळे अंगाची आग होत नाही. विहिरीच्या किंवा कुपनलिकेच्या कठीण पाण्यात साबणाचा फेस न होता शाखा तयार होतो. त्यामुळे अपमार्जक करण्याच्या साबणाचा गुणधर्म नष्ट होतो.

या पूर्वीच्या सर्व सराव चाचण्या सोडवण्यासाठी खाली पहा.
          तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाची म्हणजेच ONGC ची स्थापना 14 ऑगस्ट 1956 रोजी झाली. ONGC ही भारतातील सर्वात मोठी तेल आणि वायु संशोधन आणि उत्पादन कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय डेहराडून उत्तराखंड येथे आहे. ONGC द्वारे भारतातील सुमारे 77% कच्च्या तेलाचे आणि सुमारे 62 टक्के नैसर्गिक वायूचे उत्पादन केले जाते. व्यावसायिक दृष्ट्या भारतामधील 7 तेल साठ्यांपैकी सहातील साठ्यांचा शोध ONGC ने यशस्वीरित्या घेतला आहे.
             आपल्या सूर्यमालेतील ग्रहांच्या निर्मितीच्या वेळेस ग्रह बनण्यास निष्फळ ठरलेल्या लहान लहान खडकांना लघुग्रह असे म्हणतात. मंगळ आणि गुरु या दोन ग्रहांच्या दरम्यान या खगोलीय वस्तूंचा पट्टा निर्माण झालेला आहे. सर्व लघुग्रह सूर्याभोवती परिभ्रमण करत असतात.
          रेशीम हा नैसर्गिक धागा असून हा धागा रेशीम किटकाच्या कोशापासून तयार केला जातो. एका कोशापासून ५०० मीटर ते १३०० मीटर पर्यंत लांब धागा मिळत असतो. रेशमाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन प्रथम चीनमध्ये सुरू झाले असे म्हणतात.
        नायलॉन या धाग्याचा शोध न्यूयॉर्क व लंडन येथे एकाच काळात लागला. म्हणून न्यूयॉर्कचे Ny  व लंडनचे Lon ही अद्याक्षरे घेऊन त्याला नायलॉन असे नाव देण्यात आले. नायलॉनचे धागे चमकदार मजबूत पारदर्शी आणि जलरोधी असतात. वस्त्र निर्मिती मासेमारीची जाळी आणि दोरखंड हे तयार करण्यासाठी नायलॉनचे धागे वापरतात.

शैक्षणिक अद्ययावत बातम्या तसेच उपयुक्त शैक्षणिक साहित्य मिळवण्यासाठी group जॉईन करा.