विज्ञान विषयातील महत्वाच्या घटकावर आधारित सराव चाचणी क्र. 6

 विज्ञान विषयातील महत्वाच्या घटकावर आधारित सराव चाचणी क्र. 6
            खाली महत्त्वाच्या वीस प्रश्नाची एक चाचणी देण्यात आलेली आहे. ही चाचणी ग्रहणे,ध्वनी, चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म,आणि अवकाश तारकांच्या दुनियेत या घटकावर आधारित आहे. या घटकातील महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव होण्याच्या दृष्टिकोनातून प्रश्न काढण्यात आलेले आहेत. विद्यार्थ्यांनी सर्व प्रश्न व त्यांची उत्तरे वहीत लिहून त्यांचा योग्य पद्धतीने अभ्यास करावा. चाचणीच्या खाली काही महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत. ते सर्व मुद्दे प्रश्नांना अनुसरून आहेत. त्या प्रश्नांबद्दल अधिक माहिती मिळण्यासाठी उपयुक्त होतील. ते सर्व मुद्दे सखोल वाचन करावे.
 चाचणी सोडवण्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!!



रक्षाबंधन - सण बहीण भावाच्या नात्याचा - अधिक माहिती साठी वाचा.

या पूर्वीच्या घटक निहाय सराव चाचन्या सोडविण्यासाठी खाली पहा.

            सूर्यमालेतील घटक ग्रह,उपग्रह, धूमकेतू यांचा मानवी जीवनाशी काहीही संबंध नाही,असे विज्ञानाने शोधून काढले आहे. विसाव्या शतकात मानवाने चंद्रावर पाऊल टाकले. त्यामुळे अनेक अंधश्रद्धा लयास गेलेल्या आपणास पाहायला मिळतील.
ग्रहणे या विषयी सविस्तर माहिती वाचण्यासाठी खाली पहा.

            वैज्ञानिक घटनांमुळे अनेक कल्पना वर विश्वास ठेवणे म्हणजे स्वतःच्या वेळेचा, शक्तीचा,धनाचा अपव्यय करणेच ठरेल.त्यामुळे सर्व गोष्टींकडे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहायला शिकले पाहिजे.भारतात नवी दिल्ली, बंगळुरू, अलाहाबाद ,मुंबई व न्यू इंग्लिश स्कूल पुणे येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावाने नेहरू प्लॅनेटोरियम ही तारांगणे स्थापन केलेली आहेत.आकाश निरीक्षणासंदर्भात विविध तारे व तारखा समूहांचे आभासी सादरीकरण करण्यात येत आहे. आयुका  - (INTER UNIVERSITY CENTRE FOR ASTRONOMY & ASTROPHYSICS )ही पुणे येथे स्थित संस्था खगोल विज्ञानामध्ये मूलभूत संशोधनाचे कार्य करत आहे.
          सूर्य ज्या आयनिक वृत्तावर फिरत असतो त्या आयनिक वृत्ताचे बारा समान भाग कल्पनेने केलेले आहेत. प्रत्येक भाग 30 अंश चा असतो. प्रत्येक भागाला राशी असे म्हणतात.मेष,वृषभ,मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या बारा राशी आहेत.
         चंद्र पृथ्वीभोवती एक फेरी  सुमारे 27.3 दिवसात पूर्ण करतो. या चंद्राच्या प्रत्येक दिवसाच्या प्रवासाला एक भाग किंवा एक नक्षत्र असे म्हणतात. 360 अंशाचे 27 समान भाग केले तर प्रत्येक भाग सुमारे 13 अंश 20 मिनिटांचा येतो. 13 अंश 20 मिनिटे एवढ्या भागातील तारका समूहातील सर्वात तेजस्वी ताऱ्यावरून ते नक्षत्र ओळखले जाते. या तार्‍याला योगतारा असे म्हणतात.
आकाश निरीक्षणासाठी नेहमी ध्रुवतारा विचारात घेतात कारण ध्रुवतारा उत्तर दिशेला असतो. ध्रुवतारा शोधून आकाश निरीक्षण करणे सोपे जाते. पश्चिमेकडील तारे लवकर मावळत असल्याने सुरुवातीस आकाश…
सूर्यमाला, ग्रह, उपग्रह सविस्तर माहिती वाचण्यासाठी खाली पहा.
          धातूशोधक यंत्रांना मेटल डिटेक्टर असे म्हणतात. या यंत्रांचे कार्य विद्युत चुंबकावर आधारित असते.धातूशोधक यंत्र अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी वापरण्यात येत असतात. म्हणजेच विमानतळ,अति महत्त्वाची मंदिरे, बस स्टॅन्ड, मोठ्या इमारती, मंत्रालयासारखी ठिकाणे इत्यादी ठिकाणी प्रवेश करणाऱ्या व्यक्तींच्या तपासणीसाठी या यंत्राचा उपयोग केला जातो. अति मौल्यवान वस्तू शोधण्यासाठी विमानतळावर या यंत्राचा उपयोग करतात.तसेच अन्नप्रक्रिया उद्योगांमध्ये अनवधानाने लोखंडी वस्तू अन्नपदार्थांमध्ये मिसळली गेल्यास ते आरोग्यासाठी घातक होईल म्हणून मेटल डिटेक्टर या यंत्राचा वापर केला जातो. त्याप्रमाणेच जमिनीमधील धातूंचे प्रमाण शोधून काढण्यासाठी या यंत्रांचा वापर केला जात असतो.
          ध्वनी हा डेसिबल या एककामध्ये मोजला जातो. ध्वनीच्या तीव्रतेचा वापर करून डेसिबल या ध्वनीच्या पातळीचे परिमाण काढता येते. डेसिबल हे नाव अलेक्झांडर ग्राहम बेल यांच्या कार्याच्या स्मरणार्थ दिले गेलेले आहे. ध्वनीची तीव्रता दहा पटींनी वाढली की ध्वनी पातळी 10 डेसिबल ने वाढत असते.आपण साधारण 120 डेसिबल पर्यंत आवाज चांगल्या पद्धतीने ऐकू शकतो. मात्र 120 डेसिबल च्या पुढील आवाज कानावर पडत राहिला तर कानठळ्या बसत असतात.
ध्वनी SOUND - अत्यंत महत्वाचे मुद्दे सविस्तर वाचण्यासाठी खाली पहा.