इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग एक वर आधारित सराव चाचणी सोडवा.



        इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग एक या घटकावर आधारित 20 प्रश्नांचे सराव चाचणी तयार करण्यात आलेली आहे. ही सराव चाचणी वेगवेगळ्या घटकातील प्रश्न काढून तयार करण्यात आली आहे. पाचवी परिसर अभ्यास यातील अनेक घटक महत्त्वाचे घटक आहेत. या घटकांचा अभ्यास करून चाचणी सोडवल्यानंतर उपयुक्त होईल.

चाचणी सोडवण्यासाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा.




मानवी पचन संस्था सविस्तर माहिती वाचण्यासाठी खाली पहा.

सूक्ष्मजीव या विषयी सविस्तर माहिती वाचण्यासाठी खाली पहा.


        तंबाखू सेवन तसंच इतर मादक पदार्थाचे सेवन हे मानवी आरोग्यासाठी खूपच घातक आहे. यामुळे मानवाला तोंडाचे जिभेचे अन्ननलिकेचे कर्करोग होऊ शकतात.
        ऊर्जेचे गतिज ऊर्जा व स्थितीज ऊर्जा असे भाग केले जातात. एखाद्या पदार्थाच्या गतीमुळे मिळणाऱ्या ऊर्जेस गतीच ऊर्जा असे म्हणतात. फिरणारे पंखे, स्वयंपाक घरातील मिक्सर, पाण्याचा पंप, वाहते पाणी या सर्वांमध्येच गतीज ऊर्जा असते.
        पदार्थ सूक्ष्म कणांचे बनलेले असतात असे मत कनाद महर्षी मांडलेले आहे. कणाद महर्षी यांचा जन्म गुजरात राज्यातील सोरटी सोमनाथ जवळ झालेला होता. त्यांचे मूळ नाव उलुक होते. जगातील प्रत्येक वस्तू सूक्ष्म कणांनी बनलेली असते ही संकल्पना कनाद महर्षी मांडली. त्यांनी या कनाला पिलव असे नाव दिले.
         निसर्गातील पाणी हे वेगवेगळ्या अवस्थेत असते. निसर्गामध्ये पाणी बर्फाच्या स्वरूपात स्थायू मध्ये, पाण्याच्या स्वरूपात द्रव मध्ये तसेच बाष्पीभवन वाफ यांच्या स्वरूपात वायूमध्ये असते.
        पर्यावरणाला पूरक असणाऱ्या घरांना पर्यावरण पूरक घर असे म्हणतात. पर्यावरण पूरक घरांचे काही वैशिष्ट्य असतात. पर्यावरण पूरक घरे नैसर्गिक साधनांचा कमीत कमी वापर करून केलेली असतात. बायोगॅस पवन ऊर्जा व सौर ऊर्जा यासारख्या अपारंपारिक ऊर्जा साधनाचा वापर त्यामध्ये केलेला असतो. पाण्याचा पुनर्वापर केलेला असतो. टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर केलेला असतो. कृत्रिम साहित्यांचा कृत्रिम रंगांचा अभाव असतो. घरामध्ये नैसर्गिक प्रकाश व हवा खेळती राहण्याची सोय सुद्धा केलेली असते.
       आपला देश अन्नधान्य संदर्भात स्वावलंबी झाला आहे. त्याचबरोबर गरजेहून अधिक पिकलेले धान्य आपण परदेशात निर्यात करू शकतो. आपल्या देशात धान्य उत्पादनात झालेली प्रचंड वाढ हरितक्रांती नावाने ओळखली जाते. वैज्ञानिक, विज्ञान प्रसारक आणि शेतकरी यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे ही हरितक्रांती घडून आली. गहू व तांदळाच्या बियाणांत सुधारणा घडवून आणून हरितक्रांती करण्याचे श्रेय कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर एम. एस. स्वामीनाथन यांच्याकडे जाते.
       अन्न ही आपली मूलभूत गरज आहे. प्रत्येकाला आवश्यक व पुरेसे अन्न मिळावे या हेतूने अनेक देशाने अन्नाची हमी देण्यासाठी कायदे केले आहेत. ते अन्नसुरक्षेचे कायदे म्हणून ओळखले जातात. 2013 मध्ये आपल्या देशांनीही अन्नसुरक्षेचा कायदा केला आहे. यामुळे कुपोषण उपासमार भूकबळी इत्यादी समस्यांचा सामना करणे शक्य झाले आहे.
         नैसर्गिक पदार्थ वापरून केलेल्या शेतीला सेंद्रिय शेती म्हणतात. हा पारंपारिक शेतीचा एक प्रकार आहे. या शेतीमध्ये जमिनीतील पोषक तत्वे टिकून राहतात अशा शेतीमध्ये वापरलेले कीटकनाशकेही आपल्या शरीरावर दुष्परिणाम करत नाहीत. या शेतीमध्ये उगवलेले अन्नधान्य कसदार असते. याशिवाय चवीलाही उत्तम असते. त्यामुळे सेंद्रिय शेती करणे शेतकरी पसंत करू लागले आहेत.