पर्यावरण व प्रदूषण याबद्दल सविस्तर माहिती.

 पर्यावरण व प्रदूषण याबद्दल सविस्तर माहिती.

पर्यावरण Environment

पृथ्वीच्या पर्यावरणात दोन घटकांचा समावेश होतो.

 1] जैविक घटक 

यामध्ये प्राणी वनस्पती आणि सूक्ष्मजीवांचा समावेश होतो.

2]  अजैविक घटक 

    यामध्ये जमीन पाणी हवा हवामान यासारख्या अजीव घटकांचा समावेश होतो.

  •  पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटक म्हणजेच सजीव आणि त्यांचे भौतिक पर्यावरण यांच्यातील पारस्पारिक अंतर संबंधाचा अभ्यास करण्याच्या शास्त्र परिस्थितीकी असे म्हणतात.
  •  परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी जे मूलभूत कार्यात्मक एकक वापरले जाते त्यास परिसंस्था म्हणतात. परिसंस्था लहान किंवा मोठी असू शकते.
  • भारतात 1980 मध्ये पर्यावरण विभागाची स्थापना झाली. 1985 मध्ये या विभागाचे रूपांतर स्वतंत्र पर्यावरण आणि वन मंत्रालयांमध्ये करण्यात आले.

नैसर्गिक संसाधनांचा शोध घेण्यासाठी पुढील संस्था कार्य करतात -

1] बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया

 या संस्थेची स्थापना 1890 मध्ये कोलकत्ता येथे झाली.

 देशातील वनस्पती संसाधनांचा शोध घेणे हे मुख्य कार्य आहे.

2] झुआलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया

  • या संस्थेची स्थापना 1916 मध्ये झाली.
  •  याचे मुख्यालय कोलकत्ता येथे आहे.
  •  देशातील प्राणी संशोधनांचा शोध घेणे, लुप्त प्रजातींचा शोध घेऊन त्यांच्या संवर्धनासाठी पावले उचलणे हे या संस्थेचे कार्य आहेत.

3] फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया

  •  1981 मध्ये या संस्थेची स्थापना झाली.
  •  देहराडून येथे याचे मुख्यालय आहे.
  •  बेंगलोर कोलकत्ता नागपूर आणि सिमला येथे या संस्थेची विभागीय कार्यालय आहेत.
  •  देशातील वन जंगल शोधणे संसाधनांचा शोध घेणे हे या संस्थेचे कार्य आहे.
  •  संपूर्ण देशभरासाठी दर दहा वर्षांनी जंगल व्यक्त प्रदेशाचे नकाशे केले जातात.

पर्यावरणीय प्रदूषण 

सर्वसाधारणपणे कोणत्याही वस्तूची व पदार्थाचे दूषितिकरण म्हणजे त्याचे प्रदूषण होय.

 हे प्रदूषण हवेचे, मृदेचे, अन्नाचे, ध्वनीचे असू शकते.

1] हवा प्रदूषण

  • जागतिक आरोग्य संघटनेनुसार मानव आणि त्याच्या पर्यावरणाला घातक अशा घटकांचे हवेत अस्तित्व असणे म्हणजे हवा प्रदूषण होणे.
  • हवा प्रदूषित करणारे घटक कार्बन डाय-ऑक्साइड, कार्बन मोनॉक्साईड,हायड्रोकार्बन्स, सल्फर नायट्रोजन ऑक्साईड, हायड्रोजन सल्फाईड, धुलीकन, धूर, राख, कार्बन, सीसे इत्यादी.
  • औद्योगिक दुर्घटना 3 डिसेंबर 1984 रोजी भोपाळ येथील युनियन कार्बाइड या कारखान्यातून मिथाईल आयसोसायनेट या वायूच्या गळतीमुळे 3200 लोकांचा मृत्यू झाला.

अ] सल्फर डाय ऑक्साईड

  • हा पाण्यात चटकन विरघळणारा वायू आहे.
  •  हा कोळसा तेल इत्यादीच्या ज्वलनातून निर्माण होतो.
  •  औष्णिक विद्युत केंद्रामधून निर्माण होणाऱ्या धुरात तो प्रामुख्याने आढळतो.
  •  सल्फर डाय ऑक्साईडमुळे श्वसनाचे व फुफुसांचे रोग संभवतात.
  •  सल्फर डाय ऑक्साईड पाण्यात विरघळून आम्ल वर्षे साठी कारणीभूत ठरतो.

ब] शिसे 

  •  शिष्याची निर्मिती वाहनांचा धूर, औद्योगिक प्रक्रिया, रंगनिर्मिती, कचरा जाळणे इत्यादी मधून मोठ्या प्रमाणात होतो.
  •  श्वसनाद्वारे किंवा पिण्याच्या पाण्यातून शिसे शरीरात गेल्यावर रक्ताद्वारे सर्व शरीरात पसरते व हाडांमध्ये साचते.
  •  शिष्यामुळे मज्जासंस्था, किडनी, रोगप्रतिकारक यंत्रणा, पुनरुत्पादन संस्था, हृदयरोग इत्यादीचे रोग संभवतात.
  •  तसेच रक्ताची ऑक्सिजन वहन क्षमता कमी होते.
  •  लहान मुलांमध्ये कमी बुद्धिमत्ता व वर्तनुकजन्य आजार होतात.      
क] कार्बन मोनो ऑक्साईड
  •  कार्बन मोनॉक्साईड हा एक रंगहीन व वासहीन मात्र विषारी वायू असून तो इंधनातील कार्बनचे ज्वलन पूर्णपणे न झाल्यास निर्माण होतो.
  •  त्याची निर्मिती मुख्यतः वाहनांमधून होते.
  •  कार्बन मोनॉक्साईड ची हिमोग्लोबिन बरोबर उच्च संयोग क्षमता आहे. त्यामुळे त्यांचा संयोग झाल्याने ऑक्सिजनच्या वाहनासाठी उपलब्ध हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते.
  •  त्यामुळे निरोगी व्यक्तींना सुद्धा डोकेदुखी, डोळ्यांची जळजळ, श्वास त्रास इत्यादी सारखे आजार संभवतात.
 ड] नायट्रोजन ऑक्साईड 
  •  नायट्रोजन ऑक्साईड हे रंगहीन व वासहीन वायू असतात.
  • यामुळे जमिनी जवळ ओझोनच्या निर्मितीसाठी कारणीभूत.
  • श्वसनाचे रोग होतात.
  • आम्ल वर्षेस  कारणीभूत ठरतात.
  • जागतिक तापमान वाढीस कारणीभूत आहेत.                                                          
  इ] ओझोन 
  • स्थितांबरातील ओझोन पट्ट्यातील ओझोन जीवन रक्षक असतो.
  •  मात्र पृथ्वीच्या पृष्ठभागालगतच्या हवेतील ओझोन घातक असतो.
  •  पृष्ठभागाजवळ तो सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात नायट्रोजन ऑक्साईड आणि काही सेंद्रिय संयुगे यांच्यातील रासायनिक अभिक्रिया मुळे तयार होतो.
  •  ओझोनच्या श्वसनामुळे पुढील आजार संभवतात -  छाती दुखी, खोकला, घशाचा दाह, श्वास कोंडणे इत्यादी.
  •  ओझोन हा वनस्पतींच्या वाढीसाठी विषारी ठरतो.

जल प्रदूषण 
पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत विविध कारणामुळे प्रदूषित झालेले आहेत.
1] जीवशास्त्रीय ऑक्सिजन मागणी - BOD - BIOLOGICAL OXYGEN DEMAND 
  •  पाण्याची साधारण गुणवत्ता आणि त्याच्या प्रदूषणाचे प्रमाण मोजण्यासाठी वापरण्यात येणारी ही एक चाचणी आहे.
  •  हे प्रमाण जेवढे जास्त तेवढी पाण्याची BOD जास्त असते. 
  • BOD जेवढी जास्त तेवढे पाणी जास्त प्रदूषित असते.
  • BOD एक ते दोन मिली ग्रॅम / लिटर असेल तर पाण्याची गुणवत्ता उत्तम असते.
  • BOD  दहा पेक्षा जास्त असेल तर पाणी खूप प्रदूषित असते.
  •  पाण्याची BOD तीन मिलीग्राम पेक्षा कमी असल्यास ते आंघोळीसाठी योग्य मानले जाते.
  •  दोन मिलिग्रॅम पेक्षा कमी असेल तर ते पिण्यासाठी योग्य मानले जाते.
2] रासायनिक ऑक्सिजन मागणी - COD -  CHEMICAL OXYGEN DEMAND
  • पाण्यातील प्रदूषणाचे प्रमाण मोजण्यासाठी ही एक दुसरी चाचणी आहे.
  •  या चाचणी द्वारे पाण्याच्या नमुन्यातील सर्व सेंद्रिय द्रव्याचे पूर्ण ऑक्सिडीकरण घडवून आणण्यासाठी आवश्यक असलेले ऑक्सिजनचे प्रमाण मोजले जाते.
  • पाण्याची COD जेवढी जास्त तेवढे पाणी अधिक प्रदूषित असते.

ध्वनी प्रदूषण
  •  नकोशा वाटणाऱ्या ध्वनीचे किंवा मूल्यहीन आवाजाचे जास्त प्रमाण म्हणजेच ध्वनी प्रदूषण होय.
  •  ध्वनीची तीव्रता डेसिबल या एककात मोजतात.
  •  टेलिफोनचे संशोधक अलेक्झांडर ग्राहम बेल यांच्या स्मृत्यर्थ या एकाच डेसिबल असे म्हणतात.
  •  ध्वनीची तीव्रता त्याच्या आयामाशी संबंधित असते.
  • भारतात 1986 च्या पर्यावरण संरक्षण कायद्याने ध्वनी प्रदूषण हा प्रथम गुन्हा मांडला.
  • ध्वनी - अत्यंत महत्वाचे मुद्दे

किरणोत्सारी प्रदूषण
  • 30 एप्रिल 1986 रोजी रशियातील चेर्नोबिल या ठिकाणच्या अनुभट्टीतून किरणोत्साल बाहेर पडल्याने अनेक लोक मृतुमुखी पडले.
  • X-rays च्या उच्च प्रमाण मुळे कॅन्सरकारी अल्सर निर्माण होतात.
  • उतींचा नाश होतो.
  •  हानिकारक किरणांचा सर्वाधिक दुष्प्रभाव डोळ्यांवर पडत असतो.

पर्यावरणीय संरक्षण व प्रदूषण नियंत्रण कायदे 
  1. भारतीय वन अधिनियम 1927
  2. भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा 1972 
  3. जल प्रदूषण नियंत्रण व प्रतिबंध कायदा 1974 
  4. वन संरक्षण कायदा 1980 
  5. हवा प्रदूषण नियंत्रण प्रतिबंध कायदा 1981
  6. पर्यावरण संरक्षण कायदा 1986
  7. पर्यावरण संरक्षण नियम 1986
  8. घातक टाकाऊ पदार्थ व्यवस्थापन व हाताळणी नियम 1989
  9.  पर्यावरण औद्योगिक प्रकल्पांची स्थान निश्चिती नियम 1996 
  10. घातक जैव वैद्यकीय टाकाऊ पदार्थ व्यवस्थापन व हाताळणी नियम 1998
  11. ध्वनी प्रदूषण नियमन व नियंत्रण नियम 2000       

नैसर्गिक संसाधने - हवा, पाणी आणि जमीन सविस्तर माहिती वाचण्यासाठी खाली पहा. Natural resources - air, water and land detailed information