स्नानासाठी उतरल्यावर आपण पाण्यात सहज तरंगू शकलो तर..

 

             स्नानासाठी उतरल्यावर आपण पाण्यात सहज तरंगू शकतो. कल्पना किती छान आहे. पाण्यात उतरल्यानंतर अनेक वेळेस आपण बुडत असतो. पाण्यात तरंगण्यासाठी आपल्याला पोहायला शिकावे लागते. मात्र लहान असताना अनेक जणांनी कल्पना केलेली असते की पाण्यात जर तरंगता आले असते तर.  एक समुद्र आहे की तिथे आपण सहज तरंगू शकतो. या तरंगू शकणाऱ्या समुद्राबद्दल अधिक माहिती वाचू या.

            समुद्राचे नाव आहे मृत समुद्र. या समुद्राचे नावच तिथल्या परिस्थितीची कल्पना देते. आपण या नावावरून कल्पना करू शकतो की तेथील वातावरण कसे असेल. मग हा समुद्र नेमका कुठे आहे? कोणत्या देशामध्ये आहे? इजरायल आणि जॉर्डन या देशांच्या सीमेवर हा समुद्र आहे. या समुद्राच्या पाण्याची क्षारता दर हजारी 332 इतकी आहे. सर्वसाधारण महासागराची  क्षारता दर हजारी  35 असते. त्यामुळे इथली क्षारता खूप जास्त प्रमाणात आहे. जॉर्डन नदी ही एकच मोठी नदी या समुद्रास मिळते. या समुद्रास मिळणाऱ्या नद्या खूप कमी प्रमाणात आहेत. येथे खूप कमी प्रजन्य आहे. त्यामुळे गोड्या पाण्याचा पुरवठा या समुद्रास खूप कमी प्रमाणात होतो. येथील समुद्राचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत राहते. जेवढ्या प्रमाणात पाण्याचे बाष्पीभवन होते त्याच्या कमी प्रमाणात गोडे पाणी या समुद्रास येऊन मिळते. त्यामुळे या समुद्राच्या पाण्याची क्षारता खूप जास्त आहे. क्षारता वाढतच आहे. काही एकपेशीय जीवाव्यतिरिक्त येथे जीवसृष्टी नाही. कारण इतकी जास्त क्षारता असेल तर तिथे जीव अस्तित्वात येऊ शकत नाहीत. त्यामुळे येथे खूपच कमी प्रमाणात जीवसृष्टी आहे.

            जॉर्डन नदी व इतर लहान नद्यांमधून येणारे मासे येथे आले की ते लगेचच मरतात. त्यांना पोषक असे वातावरण येथे मिळत नाही. अधिक क्षार असल्यामुळे क्षाराचे संचयन होऊन या समुद्रात समुद्रात क्षार स्तंभ निर्माण झाले आहेत. जसे पृथ्वीवर पर्वत, डोंगर, टेकड्या असतात. त्याचप्रमाणे या समुद्रात क्षारांचे मोठे मोठे डोंगर तयार झालेले आहेत. क्षारांचे टेकड्या आहेत. त्यापैकी काही सागराच्या पृष्ठभागावर सुद्धा आलेल्या आहेत. त्या स्पष्टपणे आपण पाहू शकतो. अधिक क्षारतेमुळे येथील पाण्याची घनता खूप जास्त आहे. दुसरीकडील पाण्याच्या घनतेपेक्षा या समुद्रातील पाण्याची घनता जास्त आहे. त्यामुळे या समुद्रात बुडून मरण्याची भीती नाही. कोणीही या समुद्रात बुडू शकत नाही. स्नानासाठी उतरल्यावर या पाण्यात आपण सहज तरंगू शकतो. या मृत समुद्राचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथला भूभाग सरासरी समुद्रसपाटीपासून कमी उंचीवर आहे. जगातील सर्वात कमी उंची असलेला हा भाग असून काही भागात उंची - 400 मीटर आहे.

  हजारो माणसांच्या गर्दीतील एकटेपणा ,सविस्तर वाचा