जीवन जगत असताना...मनाचा संयम सुटत असताना

 



जीवन जगत असताना...मनाचा संयम सुटत असताना 

        परवा एक बातमी वाचण्यात आली. एका गरीब कुटुंबामध्ये लहानाचं मोठ होऊन, चांगला सॉफ्टवेअर इंजिनियर झाल्यानंतर त्याला अमेरिकेमध्ये गडगंज पगाराची नोकरी मिळून सुद्धा आयुष्यात आलेल्या कठीण प्रसंगाचा सामना करण्यात अपयशी झालेल्या एका युवकांनी आत्महत्या केली. वाचून मन सुन्न झाले. क्षणात डोळ्यासमोर त्या युवकाचा संपूर्ण जीवनपट डोळ्यासमोरून निघून गेला. मन अस्वस्थ झाल........काय झाल हे जीवन जगत असताना...कस आवर घालू नाही शकला मनाला? कोण सावरू नाही शकले का  मनाचा संयम सुटत असताना ?

जीवन जगत असताना ....मनाचा संयम सुटत असताना.......

जीवन जगत असताना आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस हा एक नवीन आव्हान घेऊन येत असतो. त्या आव्हानासोबतच अनेक नवीन संधी पण घेऊन येत असतो. आपल्या आयुष्यात आलेल्या आव्हानांना डगमगून न जाता खंबीरपणे त्या कठीण परिस्थितीचा सामना केल्यानंतर आपल्याला एक चांगली संधी मिळू शकते.गरज असते ती फक्त त्या कठीण परिस्थितीमध्ये स्वतःला सावरण्याची. स्वतःला टिकवून ठेवण्याची. प्रत्येक अंधाऱ्या रात्री नंतर, एका सुंदर पहाट येताच असते, नंतर एक चांगली सकाळ होतच असते.फक्त टी सकाळ पाहण्याचा संयम असला पाहिजे. समुद्राला ओहोटी आल्यानंतर भरती ही येणारच असते. भरती आणि ओहोटी हा निसर्गाचा नियम आपल्या आयुष्याला नाही का लागू होणार मग ? 

          तीव्र उष्ण उन्हाळा संपून गेल्यानंतर जमीन जेव्हा खूप तापलेली असते, अशा तापलेल्या जमिनीवर पावसाचे अलगदबिंदू पडून ती जमीन थंड होत असते. उन्हाने त्रासलेली जमीन पावसाचे तुषार तिच्या अंगावर पाडून घेतल्या नंतर ती तृप्त होत असते. सुंदर पावसाळा अल्हाददायक वातावरण निर्माण करत असतो.गरज असते ती फक्त उष्ण उन्हाळा सहन करण्याची.

        आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अपयशानंतर, अपयशाच्या साखळीनंतर एखादं तरी यश अस आयुष्यात मिळून जातं की आलेल्या प्रत्येक अपयशाला हे यश पुसून टाकत असत. गरज असते ती फक्त आपल्या संयमाची, आपल्या मनाला कणखर बनवण्याची. जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये खूप कठीण समस्या येतात अशा कठीण समस्यांमध्ये स्वतःला सावरलं पाहिजे. स्वतःच्या मनाला समजावून सांगितलं पाहिजे की ही परिस्थिती निघून जाणार आहे. गरज आहे ती फक्त मला या परिस्थितीमध्ये स्वतःला सावरण्याची आणि या सर्व वाईट वेळेतून माझ्या आयुष्यात नक्कीच चांगले मिळेल असं आपल्या मनाला सांगण्याचे. समस्या जीवना मध्ये आल्या की जीवन अंधकारमय वाटू लागतं. आपण अनेक ठिकाणी बातम्यांमध्ये पहात असतो आपल्या आजूबाजूला सुद्धा अनेक घटना घडत असतात, अनेक जण तर अगदी शेवटचं पाऊल उचलतात. अगदी आत्महत्या करण्यासारखं!!! आत्महत्या करण हा खूप मोठा निर्णय असतो.  त्यांना वाटतं की आता आपल्या आयुष्यातलं सगळं काही संपलेल आहे. आपल्या आयुष्यात काहीच उरलेलं नाही आणि त्यांना सगळीकडे अंधार जाणू लागतो. अशातच  हे टोकाचे पाऊल उचलत असतात. असा विचार करणाऱ्या सर्वांना एक सांगू इच्छितो जरी आपल्यासमोर अंधकारमय जीवन उभं टाकलेल असेल तरी अशा अंधकार मय जीवनात कुठून ना कुठून तरी कधी ना कधी एक प्रकाशाची किरण येताच असते. गरज असते ती फक्त आपल्या मनाच्या संयमाची. 

          एक छोटीशी पणती जरी संपूर्ण अंधाराला भेदु  शकत नसली तरी ती आपल्या आजूबाजूचा अंधार मात्र संपवण्याचा नक्कीच काम करत असते.तिच्यात तितके सामर्थ्य नक्कीच असते. त्यामुळे आयुष्यात आलेल्या समस्यांना निर्भयपणे सामोरे जाण्याची शक्ती आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. आपण कणखर बनला पाहिजे. आपल आयुष्य ही आपली स्वतःची देण असत नाही. मग ते आयुष्य स्वतः काढून घेण्याचा हक्क आपल्याला मुळातच नसतो. निसर्गात दोन व्यक्तींच्या मिलनातून आपला जन्म झालेला असतो, आणि आपण या पृथ्वीतलावर एक जीव म्हणून जन्माला आलेलो असतो. या निसर्गामध्ये वाढत असतो. मात्र आपण आपला आयुष्य संपवून टाकण्यासाठी कधीही पुढाकार न घेता त्याची सर्वस्वी जबाबदारी या निसर्गावरच दिली पाहिजे. ज्या पद्धतीने एखाद पान पालवीच्या स्वरूपात झाडाला लागतं आणि ते संपूर्ण आयुष्य जगून नंतर पिवळं होऊन जेव्हा खाली पडतं. हाच निसर्गाचा नियम आपल्या आयुष्यात सुद्धा लागू होतो. जेव्हा बालपण कुमारावस्था तारुण्य पण प्रौढ पणा आणि सर्वात शेवटी वार्धक्य अशा आयुष्याची  टप्पे पार करून मग आपण शेवटी असता कडे जात असतो.  तेव्हा झालेला शेवट हा नैसर्गिक असतो. या सर्व क्रियातून जात असताना गरज असते ती फक्त आपल्या मनाच्या संयमाची. मनाचा संयम कधीही ढळू दिला नाही पाहिजे. मनाला सतत सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे की,आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच चांगले दिवस येतील... नक्कीच चांगले दिवस येतील.......आयुष्य जगत असताना ...मनाचा संयम सुटत असताना......


क्रमश....................... 

रणांगणावर झालेला पराभव चालेल पण ......सविस्तर VACHA